पूर पाहण्यासाठी गर्दी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:01+5:302021-07-24T04:16:01+5:30
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून, नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. तरी नागरिकांनी पूर ...
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून, नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. तरी नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला पुरामुळे राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या नागरिकांची सोय करा, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शिरोळ तालुक्यात सर्व टीम कार्यरत ठेवा, अशा सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी असाच पाऊस सुरू राहिला तर आणि धरणातून विसर्ग सोडल्यास २०१९ पेक्षा गंभीर स्थिती निर्माण होईल. पूर परिस्थितीत प्रशासन चांगले काम करीत आहे. स्थलांतरित केलेल्या नागरिकांना प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
----
फोटो कोलडेस्कला हसन मुश्रीफ बैठक नावाने
ओळ : पुराच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली.
---