वाघाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:55 PM2020-01-14T15:55:05+5:302020-01-14T15:57:45+5:30

शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; असा विरोधकांना इशारा देतानाच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गात गोव्यापेक्षा सरस काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले.

 Don't try to get into a tiger limb: the rising feud | वाघाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका : उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांचा वैभववाडीत शिवसेना कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते, अतुल रावराणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देपहिल्याच दौऱ्यात इरादे केले स्पष्ट गोव्यापेक्षा सिंधुदुर्ग सरस बनविण्याची ग्वाही; वैभववाडीत जंगी स्वागत

वैभववाडी : शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; असा विरोधकांना इशारा देतानाच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गात गोव्यापेक्षा सरस काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले.

पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पहिला जिल्हा दौरा केला. या दौºयाची सुरुवात वैभववाडी तालुक्यापासून झाली. त्यानिमित्त येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, महिला आघाडीप्रमुख निलम सावंत, बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी झिमाळ, तालुकाप्रमुख मंगेश लोके, नंदू शिंदे, दीपक पांचाळ, संभाजी रावराणे, प्रदीप रावराणे, अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, राज्यात सर्वात चांगला विकास करण्याची संधी सिंधुदुर्गात आहे. पर्यटन विकासाला येथे मोठी संधी आहे. त्यादृष्टीने येत्या काळात अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. ह्यसिंधुदुर्गसारखा गोव्याचा विकास कराह्ण अशी म्हणण्याची वेळ गोव्यातील जनतेवर यावी, असा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विकास प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेतले जाईल.

जिल्ह्यातील शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कॅबिनेटमंत्री आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा वाघ आहे. त्यामुळे हे कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, संघटनेला प्राधान्य देणारा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला आहे.

संघटना वाढीसाठी पालकमंत्री सामंत अधिक वेळ देतील, असा विश्वास व्यक्त करीत दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी आणला. त्याचप्रमाणे नूतन पालकमंत्री सामंतसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आणतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अतुल रावराणे म्हणाले, पालकमंत्री उदय सांमत यांची विकासकामे करण्याची शैली सर्वश्रुत आहे. ते रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातही त्याच शैलीने विकास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संकल्प : पुढचा आमदार शिवसेनेचा

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचा पुढचा आमदार हा शिवसेना, महाविकास आघाडीचाच होईल असा संकल्प निश्चित करूनच आजच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भगवा फडकविणारच, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

सत्कार फुकट जाणार नाही

पालकमंत्री म्हणून वैभववाडीत आल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी माझा मनापासून सत्कार केला. हा सत्कार फुकट जाऊ देणार नाही. तसेच सत्कार कशाला केला म्हणून कार्यकर्त्यांना पश्चात्तापही होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिली.


 

Web Title:  Don't try to get into a tiger limb: the rising feud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.