घरात पाणी येण्याची वाट बघू नका, स्थलांतरित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:37+5:302021-07-23T04:15:37+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, बुधवारी रात्रीपासून नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तरी नागरिकांनी घरात पाणी येण्याची ...

Don't wait for water to come into the house, migrate | घरात पाणी येण्याची वाट बघू नका, स्थलांतरित व्हा

घरात पाणी येण्याची वाट बघू नका, स्थलांतरित व्हा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, बुधवारी रात्रीपासून नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तरी नागरिकांनी घरात पाणी येण्याची वाट बघू नये, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांनी स्थलांतरित व्हावे व सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केले.

जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत, तसेच याठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेडस्‌ काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये. गर्भवती महिला, कोरोनाचे रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक, तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे.

नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची आवश्यक ती व्यवस्था केली आहे, तरी नागरिकांनी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

स्थलांतरित होताना ही काळजी घ्या

- महत्त्वाची कागदपत्रे, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मौल्यवान वस्तू, औषधे, स्वत:चे साहित्य जसे साबण, ब्रश, पेस्ट, मोबाइल चार्जर, आवश्यक कपडे, दोरी आदी साहित्य सोबत घ्यावे.

-घर सोडताना अवजड किमती साहित्य जसे धान्य, सोफा, टीव्ही कपाटे इ. घरातील सर्वांत उंच ठिकाणी ठेवावे. घरातील लाइटचा मेन स्विच, गॅस सिलिंडर बंद करावेत.

---

Web Title: Don't wait for water to come into the house, migrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.