रिक्षांवर बसविल्या जाणाऱ्या रिफ्लेक्टर पट्टीचा भुर्दंड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:01+5:302021-06-22T04:17:01+5:30

कोल्हापूर : रस्ते सुरक्षेसाठी परिवहन विभागाने ऑटोरिक्षांना नव्या नियमानुसार २० मिलीमीटरची रिफ्लेक्टर पट्टी क्यूआर कोडसह बसविणे बंधनकारक केले आहे. ...

Don't wear a reflector strap on a rickshaw | रिक्षांवर बसविल्या जाणाऱ्या रिफ्लेक्टर पट्टीचा भुर्दंड नको

रिक्षांवर बसविल्या जाणाऱ्या रिफ्लेक्टर पट्टीचा भुर्दंड नको

Next

कोल्हापूर : रस्ते सुरक्षेसाठी परिवहन विभागाने ऑटोरिक्षांना नव्या नियमानुसार २० मिलीमीटरची रिफ्लेक्टर पट्टी क्यूआर कोडसह बसविणे बंधनकारक केले आहे. पण ही पट्टी मान्यता दिलेल्या कंपन्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जादा किमतीची पट्टी घेणे रिक्षाचालकांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे या नियमात बदल करून नियमित पट्टी बसविण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांच्याकडे सोमवारी करण्यात आली.

रस्ते सुरक्षा सुधारित कायद्यात ऑटोरिक्षाला २० मिलीमीटर रिफ्लेक्टर पट्टी क्यूआर कोडसह बसविणे बंधनकारक केले आहे. मात्र, ही पट्टी परिवहन विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अवजड वाहनांना लागणारी ५० मिलीमीटरची पट्टी आहे. ही कमीत कमी १० मीटर लांबीची घ्यावी लागेल असा आग्रह कंपन्यांचा आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना एक हजाराहून अधिक भुर्दंड बसणार आहे. कोरोना काळात रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे असे नियम काढून रिक्षाचालकांना अडचणीत आणू नये. याची अंमलबजावणी केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. असाही इशारा आपच्या रिक्षा संघटनेतर्फे देण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, राकेश गायकवाड, लाला बिरजे, प्रकाश हरणे, विजय भोसले, बाबुराव बाजारी, महेश घोलपे, विशाल वठारे, रामचंद्र गावडे, मंगेश मोहिते, सुभाष भांडवले, संभाजी देसाई, संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

फोटो : २१०६२०२१-कोल-आप

आेळी : कोल्हापुरात आम आदमी पार्टीतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांना रिक्षा रिफ्लेक्टर नियमात बदल करावा. यासाठी सोमवारी निवेदन देण्यात आले.

===Photopath===

210621\21kol_4_21062021_5.jpg

===Caption===

फोटो : २१०६२०२१-कोल-आपआेळी : आम आदमी पार्टीतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांना रिक्षा रिफ्लेक्टर नियमात बदल करावा. यासाठी सोमवारी निवेदन देण्यात आले. 

Web Title: Don't wear a reflector strap on a rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.