‘चांदोली’चे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2016 11:04 PM2016-08-05T23:04:35+5:302016-08-06T00:29:42+5:30

९ हजार ८00 क्युसेकने विसर्ग : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

The doors of 'Chandoli' were opened | ‘चांदोली’चे दरवाजे उघडले

‘चांदोली’चे दरवाजे उघडले

Next

वारणावती : चांदोली धरण परिसरात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाचे चार वक्राकार दरवाजे शुक्रवारी सायंकाळी उघडण्यात आले. चारही दरवाजे 0.७५ मीटरने खुले करून त्यातून ९ हजार ८00 क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला आहे. शिवाय जलविद्युत केंद्र्राकडून १२00 क्युसेक असा एकूण ११ हजार क्युसेकचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.
गेल्या ३६ तासांत या परिसरात १३५ मिलिमीटर पावसासह एकूण १८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचदिवशी १३१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. धरणात सध्या ३२.२६ टीएमसी पाणीसाठा असून, धरणाची पाणी पातळी ६२५.२0 मीटर आहे. ९३.७७ टक्के धरण भरले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रात्री धरणाच्या दरवाजातून विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील गावांना पाटबंधारे खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, वारणा पाटबंधारे विभाग कोडोलीचे सहायक अभियंता ए. पी. निकम व वारणावती येथील शाखा अभियंता प्रदीप निकम, आर. पी. खोत यांच्या हस्ते बाहेर पडलेल्या पाण्याचे पूजन केले. (वार्ताहर)

पाऊसपाणी
धरण क्षमता साठा पाऊस
(टीएमसी) (टीएमसी) (मि.मी.)
कोयना १0५.२५ ८०.२४ ६९
चांदोली ३४.४० ३१.४९८ ७५
दूधगंगा २५.३९ १६.६९० ११५
धोम १३.५0 ११.७१ १३
नीरा देवघर ११.९१ १०.९६ ५९
कण्हेर १0.१0 ९.३१ २०
उरमोडी ९.८0 ८.८८ ३९
राधानगरी ८.३६१ ८.२९६ १२६
बलकवडी ४.0८ ३.५७ ५२
पाटगाव ३.७१६ २.६३० ६४
तुळशी ३.४७१ २.५८७ ७४
कासारी २.७५२ २.५३८ २३०
कुंभी २.७१३ २.६०५ १४७

Web Title: The doors of 'Chandoli' were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.