विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी हुंडाबळीची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:46+5:302021-08-24T04:28:46+5:30

वाघापूर येथील जवान सुशांत बरकाळे याच्याशी अनुराधा माळवेकर हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर तिचा पती सुशांत, सासरे ...

Dowry victim's complaint in marital suicide case | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी हुंडाबळीची फिर्याद

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी हुंडाबळीची फिर्याद

Next

वाघापूर येथील जवान सुशांत बरकाळे याच्याशी अनुराधा माळवेकर हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर तिचा पती सुशांत, सासरे सात्ताप्पा, नणंद साधना आनंदा पाटील (रा. इचलकरंजी) हे तिचा जाच करू लागले. आम्हाला शेतजमीन घ्यायची आहे. लग्नात हुंडा दिला नाही. आता तुझे वडील सेवानिवृत्त झालेत. त्यांच्याकडून ५ लाख रुपये आण, अशी पैशाची वारंवार मागणी करून छळ करू लागले. नवऱ्याने तिला फोनवरून सांगितले की हा त्रास जर कोणाला सांगितलास तर मी गोळी झाडून घेऊन आत्महत्या करीन. त्यानंतर नणंद साधना ही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याला सांगून मानसिक छळ करू लागले. या मानसिक त्रासाला शनिवारी (दि. २१) रोजी अनुराधा हिने दुपारी कोणीही घरी नसल्याचे पाहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत हा रांची (उत्तरांचल) येथे सेवा बजावत आहे. संशयित आरोपी सुशांत याला अटक केली आहे.

फोटो ओळ

अनुराधा बरकाळे

Web Title: Dowry victim's complaint in marital suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.