डॉ. अरुण निगवेकर निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:40+5:302021-04-24T04:25:40+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. निगवेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. दि. १ फेब्रुवारी ...
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे
डॉ. निगवेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. दि. १ फेब्रुवारी २००३ रोजी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिले होते. विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासमवेत डॉ. निगवेकरही होते. या समितीच्या पहिल्या बैठकीत त्यांनी या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगत देणगीही जाहीर केली होती.
चौकट
विद्यापीठातील संशोधनाला ‘नेटवर्क’ पाठबळ
दीक्षान्त समारंभाच्या भाषणामध्ये डॉ. निगवेकर यांनी शिवाजी विद्यापीठात व्हीसॅॅट-बी बसविला जाईल. संदेश दळणवळणासाठी पहिल्या टप्प्यात १२८ इतकी बँड विड्थ उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी विद्यापीठातील संशोधनाकरिता नेटवर्क उपलब्ध करून देत पाठबळ दिले.
निगवेकर परिवाराचे भूषण हरपले
माझे काका डॉ. अरुण निगवेकर यांचे बी. एस्सी.पर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये, तर पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले. तेथून ते परदेशात गेले, तरी कोल्हापूरशी त्यांची नाळ तुटली नव्हती. यूजीसीचे आणि उच्च शिक्षणाच्या मूल्यमापनासाठीची अग्रणी संस्था नॅक यांचे ते संस्थापक-अध्यक्ष असले तरी कुटुंबातील प्रत्येकाच्या करिअरबद्दल त्यांना आस्था होती. माझे वडील वसंत आणि काका मुकुंद निगवेकर दोघेही साहित्यिक, त्यामुळे ते कोल्हापुरात आले की आम्हाला साहित्यावरील चर्चेची मेजवानी मिळत असे. वडील आणि काकांच्या बालकुमार साहित्य सभेबद्दल अरुणकाकांना अतीव आत्मीयता होती. त्या सभेच्या सर्व कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती असे. कोल्हापुरातील विविध संस्थांनी आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानांचा लाभ घेण्यासाठी आम्हा सर्व कुटुंबीयांना ते आवर्जून निमंत्रण देत. माझ्या सांगीतिक शिक्षणातील प्रगतीचे त्यांना खूप कौतुक होते. ते मला मार्गदर्शन करीत. त्यांच्या निधनामुळे आमच्या निगवेकर परिवाराचे भूषण हरपले आहे.
- डॉ. अंजली निगवेकर, संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.
चौकट
‘निर्भय व्हा’ आत्मकथन
डॉ. निगवेकर यांचे आत्मकथन ‘निर्भय व्हा! इतिहास तुमच्या प्रतीक्षेत आहे.’ या पुस्तकात आहे. 'Be Bold, History is waiting for You' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा ‘निर्भय व्हा’ हा मराठी अनुवाद आहे. त्याचे प्रकाशन कोल्हापुरातील सिंधू प्रकाशनने केले आहे.
फोटो (२३०४२०२१-कोल-अरुण निगवेकर कॉन्व्होकेशन) : शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ दि. १ फेब्रुवारी २००३ रोजी झाला. या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण निगवेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी तत्कालीन कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले, प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण, आदी उपस्थित होते.