भीमरायांना वंदनासाठी ऐतिहासिक माणगाव मध्ये लोटला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:43 PM2023-04-14T12:43:50+5:302023-04-14T12:44:14+5:30
हजारो भीमअनुयायी दाखल
अभय व्हनवाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रूकडी माणगाव: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती प्रसंगी माणगांव येथील ऐतिहासिक नगरीत त्याना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसागर लोटला होता. माणगाव येथे 1920 साली झालेल्या ऐतिहासिक माणगा व परिषदमुळे येथे भीमज्योत नेण्याकरिता राज्यातून हजारोंच्या संख्येने भीमसैनिक येत असतात.भीमज्योत नेण्याकरिता रात्रौ दहा वाजताच भीमअनुयायी दाखल झाले होते.
येथे झालेले ऐतिहासिक परिषद ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बौध्द समाजाचे अध्यक्ष अमर कांबळे व पवन गवळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर सामुदायिक बुध्द वंदना करण्यात आले.बुध्द वंदना नंतर राञौ 12 वाजता भीमज्योत प्रज्वलित करण्यात आले.भीमज्योत माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे , दलितमिञ अशोकराव माने ,सरपंच राजू मगदूम,तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले. पहिली ज्योत निपाणी कारजगा येथील भीमअनुयायी यांना प्राप्त झाले. भीमज्योत नेण्याकरिता राञौ प्रचंड गर्दी झाली होती. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील माणगाव फाटा येथील मुख्य मार्ग बंद करण्यात आला होता.भीमज्योत नेण्याकरिता येणारे भीमअनुयायीचे मुख्य मार्गावर विविध ठिकाणी स्वागत करण्यात येत होते.
राज्यातून जवळपास 175 गावातील अनुयायी भीमज्योत नेले.उपस्थित याना प्रमाणपञ देण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अख्तर भालदार,अरूण मगदूम, अनिल माणगावकर, सदस्य नितीन काबळे,तलाठी जयंत पोवार ,नंदकुमार शिंगे,मुरलीधर कांबळे,अशोक कांबळे,सुंदर कांबळे सहग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.