शासकीय कोविड सेंटरच्या प्रमुख डॉक्टराना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:59+5:302021-06-11T04:17:59+5:30
हातकणंगले ( प्रतिनिधी ) तालुक्यातील एका शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख प्रथम श्रेणी डॉक्टरना चोप देण्याचा प्रकार घडला. सहाय्यक महिला ...
हातकणंगले ( प्रतिनिधी )
तालुक्यातील एका शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख प्रथम श्रेणी डॉक्टरना चोप देण्याचा प्रकार घडला. सहाय्यक महिला डॉक्टरला नाहक त्रास दिल्याच्या कारणावरून तिच्या नातेवाइकांनी रामलिंग फाटावरील एका हॉटेलमध्ये दिला चोप. हा प्रकार आज, सायंकाळी सहा वाजता घडला. यावेळी परिसरातील नागरिक आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
तालुक्यातील एका जेष्ठ जिल्हा परिषद सदस्यांनी हे प्रकरण मिटवल्याने पोलिसाना यांचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेची नोंद पोलिसात झाली नाही. यामुळे मारहाण करणारे बिनधास्त फिरत आहेत.
शासनाच्या कोविड सेंटरचे प्रमुख असलेले प्रथम श्रेणी डॉक्टर गेल्या मार्च २०२० पासूनच्या पहिल्या लाटेपासून गेली दीड वर्ष कोरोनाच्या बचावासाठी काम करत आहेत. या शासकीय कोविड सेंटरमध्ये इचलकरंजी शहरातील महिला डॉक्टर सहाय्यक म्हणून काम करत आहे. या महिला डॉक्टरला वारंवार कोविड सेंटरचे प्रमुख असलेले हे डॉक्टर त्रास देत होते. तसेच त्यांना मानसिक त्रास होईल, असे वर्तन करत होते. होणारा त्रास या डॉक्टर महिलेने आपल्या घरी नातेवाइकांना सांगितला. नातेवाइकानी या डॉक्टरला रामलिंग फाटा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये चोप दिला. या घटनेची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नसल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.