डॉ. आंबेडकर सभागृह, शिवतीर्थ सुशोभिकरण काम त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:32+5:302021-01-22T04:23:32+5:30

या दोन्ही कामांचा आढावा घेण्यासाठी स्वामी यांनी गुरुवारी बैठक घेतली. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम ...

Dr. Complete the beautification work of Ambedkar Hall, Shivteerth immediately | डॉ. आंबेडकर सभागृह, शिवतीर्थ सुशोभिकरण काम त्वरित पूर्ण करा

डॉ. आंबेडकर सभागृह, शिवतीर्थ सुशोभिकरण काम त्वरित पूर्ण करा

Next

या दोन्ही कामांचा आढावा घेण्यासाठी स्वामी यांनी गुरुवारी बैठक घेतली. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम तसेच शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या शिवतीर्थ सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. या दोन्ही कामाबाबत शहरातील सामाजिक संघटनांकडून वारंवार नगराध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे ही बैठक घेण्यात आली. बैठकीत दोन्ही कामांसंदर्भात संबंधित अधिकारी आणि या कामाच्या मक्तेदारांकडून कामाची सद्य:स्थिती जाणून घेण्यात आली. त्यानंतर नियोजित बांधकामाची समक्ष पाहणी केली. ही दोन्ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने ३१ मार्च २०२१ अखेर ती तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे गोवा विधानसभा सभागृहाच्या धर्तीवर बांधण्यात येणार असून, याठिकाणी सर्व सोयींनीयुक्त ११८ नगरसेवक बसण्याची क्षमता, अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी बैठक व्यवस्था तसेच पत्रकारांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, प्रेक्षक गलरी, सदस्यानी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी अधिकारी वर्गासाठी पेडिअम अशा सुविधा असणार आहेत, अशी माहिती दिली. बैठकीस नगरसेवक मदन कारंडे, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, महिला बाल कल्याण सभापती सारिका पाटील, मनोज हिंगमिरे, नगरअभियंता संजय बागडे, शहाजी भोसले, ठेकेदार सुदर्शन पाटील, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Complete the beautification work of Ambedkar Hall, Shivteerth immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.