डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून कस्तुरी सावेकर हिला एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:22+5:302021-05-26T04:25:22+5:30

कोल्हापूर : येथील सर्वांत कमी वयाची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर ही सध्या एव्हरेस्ट शिखर मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. मोहिमेसाठी ...

Dr. D. Y. One lakh donation to Kasturi Savekar from Patil Group | डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून कस्तुरी सावेकर हिला एक लाखाची मदत

डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून कस्तुरी सावेकर हिला एक लाखाची मदत

Next

कोल्हापूर : येथील सर्वांत कमी वयाची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर ही सध्या एव्हरेस्ट शिखर मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. मोहिमेसाठी येणारा खर्च लक्षात घेता डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश मंगळवारी प्रदान केला.

कस्तुरी ही सध्या माउंट एव्हरेस्ट मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी अंदाजे ४२ लाख रुपयांचा खर्च असून, ही मोहीम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन सावेकर कुटुंबीयांनी केले होते. कोल्हापूरच्या या रणरागिणीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने पुढाकार घेत आमदार ऋतुराज पाटील यांनी दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी कोल्हापूर जिल्हा माउंटेनरिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. विश्वनाथ भोसले, जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, अमित सावेकर उपस्थित होते.

चौकट

कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहोचवील

जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकावीत कस्तुरी ही कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहोचवील, असा विश्वास व्यक्त करीत आमदार पाटील यांनी कस्तुरीला शुभेच्छा दिल्या. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपने केलेल्या आर्थिक मदतीमुळे कस्तुरीच्या मोहिमेसाठी मोठे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करीत दीपक सावेकर यांनी आभार मानले.

फोटो (२५०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर मदत) : एव्हरेस्ट शिखर मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यावर असणाऱ्या कोल्हापूरची कस्तुरी सावेकर हिच्या मोहिमेसाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने आमदार ऋतुराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी डावीकडून महादेव नरके, विश्वनाथ भोसले, डी. डी. पाटील उपस्थित होते.

===Photopath===

250521\25kol_6_25052021_5.jpg

===Caption===

फोटो (२५०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर मदत) :  एव्हरेस्ट शिखर मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यावर असणाऱ्या कोल्हापूरची कस्तुरी सावेकर हिच्या खर्चासाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने आमदार ऋतूराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश दिला. यावेळी डावीकडून महादेव नरके, विश्वनाथ भोसले, डी. डी. पाटील उपस्थित होते.

Web Title: Dr. D. Y. One lakh donation to Kasturi Savekar from Patil Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.