डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने आज कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:33+5:302021-07-22T04:15:33+5:30

येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया याबद्दल गुरुवारी ऑनलाइन कार्यशाळा ...

Dr. D. Y. Workshop on behalf of Patil Polytechnic today | डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने आज कार्यशाळा

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने आज कार्यशाळा

Next

येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया याबद्दल गुरुवारी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता ही ऑनलाइन कार्यशाळा होणार असून, यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातसुद्धा अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत? करिअर क्षेत्र कसे निवडावे? याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याबरोबरच डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते, प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीने कोणकोणत्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती दिल्या जातात, याबद्दलही या कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.

या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, ॲडमिशन विभाग प्रमुख प्रा. बी. जी. शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नितीन माळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Dr. D. Y. Workshop on behalf of Patil Polytechnic today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.