जिल्हा परिषदेच्या डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:59 PM2020-03-03T17:59:50+5:302020-03-03T18:02:25+5:30

कोल्हापूर : जनसेवा ही ईश्वरसेवा असून, चांगले कामाचे कौतुक सर्वत्र होते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. त्यासाठी आहार, ...

Dr. Distribution of Anandibai Joshi Award | जिल्हा परिषदेच्या डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण

जिल्हा परिषदेच्या वतीने मंगळवारी डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने आरोग्य केंद्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरणमहिलांच्या आरोग्यासाठी त्रिसूत्री आवश्यक : बजरंग पाटील 

कोल्हापूर : जनसेवा ही ईश्वरसेवा असून, चांगले कामाचे कौतुक सर्वत्र होते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. त्यासाठी आहार, चांगल्या सवयी व वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.

गोवर रुबेला मोहीम यशस्वी करणाऱ्या संस्था, एन.जी.ओ. अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कुटुंब कल्याण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, सर्जन, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचा आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

मंगळवारी शाहू सभागृहात अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने, आरोग्य समिती सदस्य रेश्मा राहुल देसाई, सुनिता रेडेकर, पुष्पा आळतेकर, सचिन बल्लाळ, अनिता चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले. सूत्रसंचालन सविता कुंभार यांनी केले, आभार डॉ. फारुख देसाई यांनी मानले.


 

 

Web Title: Dr. Distribution of Anandibai Joshi Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.