डॉ. काटकर दाम्पत्याचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:31 AM2021-08-14T04:31:07+5:302021-08-14T04:31:07+5:30

इचलकरंजी : बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी कारवाई केलेल्या डॉ. काटकर दाम्पत्याकडे चौकशी सुरू आहे. मात्र, डॉ. काटकर दाम्पत्य चौकशीसाठी ...

Dr. Find the Katkar couple | डॉ. काटकर दाम्पत्याचा शोध घ्या

डॉ. काटकर दाम्पत्याचा शोध घ्या

googlenewsNext

इचलकरंजी : बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी कारवाई केलेल्या डॉ. काटकर दाम्पत्याकडे चौकशी सुरू आहे. मात्र, डॉ. काटकर दाम्पत्य चौकशीसाठी उपस्थित राहत नसल्याने शुक्रवारी आरोग्य विभागाने त्यांचा शोध घ्यावा असे पत्र शिवाजीनगर पोलिसांना दिले.

आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवून डॉ. भाऊसाहेब काटकर यांना प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी करताना ११ ऑगस्टला रंगेहात पकडले होते.

तसेच सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची अवजारे, कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या प्रकरणी डॉॅक्टर दाम्पत्य आणि गर्भलिंग निदान चाचणीसाठी साहाय्य करणाऱ्या वृद्ध महिलेकडेही दोन दिवस कसून चौकशी केली. मात्र, गुरुवार (दि.१२) पासून काटकर दाम्पत्य चौकशीसाठी उपस्थित राहत नाही. त्यामुळे पथकाने काटकर रुग्णालयातही चौकशी केली. मात्र, ते रुग्णालय बंद असल्याने आरोग्य विभागाने काटकर दाम्पत्य चौकशीसाठी उपस्थित राहत नसल्याबाबतचे पत्र शिवाजीनगर पोलिसांना दिले आहे. त्यामध्ये डॉ. काटकर दाम्पत्य मिळून आल्यास कळवण्याचेही नमूद केले आहे. यामुळे डॉ. काटकर दाम्पत्याने पलायन केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Web Title: Dr. Find the Katkar couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.