कुरूकलीचे डॉ. अरुण पाटील ‘घोडावत विद्यापीठा’चे नवे कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:00+5:302021-05-14T04:24:00+5:30

डॉ. पाटील यांचे मूळ गाव कुरूकली (ता. कागल) आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कागलमध्ये, तर शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स ...

Dr. Kurukali. Arun Patil is the new Vice Chancellor of Ghodavata University | कुरूकलीचे डॉ. अरुण पाटील ‘घोडावत विद्यापीठा’चे नवे कुलगुरू

कुरूकलीचे डॉ. अरुण पाटील ‘घोडावत विद्यापीठा’चे नवे कुलगुरू

Next

डॉ. पाटील यांचे मूळ गाव कुरूकली (ता. कागल) आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कागलमध्ये, तर शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून एम.एस्सी.चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचे कार्य केले. युनेस्कोने त्यांना पीएच.डी.साठी स्कॉलरशिप प्रदान केली. त्याआधारे त्यांनी मेलबर्न येथील मोनॅश विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांना शिक्षण क्षेत्रातील ३१ वर्षांचा अनुभव आहे. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रोजेक्ट अँड डिझाईन बेस्ड शिक्षण पद्धती अधिक प्रभावशाली असल्याचे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले आहे.

प्रतिक्रिया

घोडावत विद्यापीठाला सर्वतोपरी अव्वल बनविण्यासाठी डॉ. अरुण पाटील यांच्यासारखी कार्यतत्पर व्यक्ती आमच्या विद्यापीठास कुलगुरू म्हणून लाभली आहे. ही विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब आहे.

-संजय घोडावत, अध्यक्ष, घोडावत विद्यापीठ.

चौकट

डॉ. पाटील यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सेंट्रल क्वीन्सलँड विद्यापीठाचे उपअधिष्ठाता, डेकिन विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचे प्रमुख, राजस्थानमधील अमिटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी काम केले. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन एआयएम अवॉर्ड्स इंडियाने त्यांना अभिनव कुलगुरू पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत. विविध पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या संशोधन प्रकल्पांना ऑस्ट्रेलियन, मलेशियन, रशियन, व्हिएतनाम देशांमधून अनुदान मिळाले आहे. ते इंजिनिअर्स ऑस्ट्रेलिया, युरोपियन सोसायटी फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन, ऑस्ट्रेलियन कोलॅबोरेटिव्ह एज्युकेशन नेटवर्क, ऑस्ट्रेलियन असोसिएशन फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशनचे सक्रिय सदस्य आहेत.

फोटो (१३०५२०२१-कोल-अरुण पाटील (घोडावत युनिव्हर्सिटी)

===Photopath===

130521\13kol_1_13052021_5.jpg

===Caption===

फोटो (१३०५२०२१-कोल-अरूण पाटील (घोडावत युनिर्व्हिसिटी)

Web Title: Dr. Kurukali. Arun Patil is the new Vice Chancellor of Ghodavata University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.