डॉ. मा. गो. माळी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:29+5:302021-05-29T04:18:29+5:30

डॉ. माळी हे थोर साहित्यिक होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक पुस्तके त्यांनी ...

Dr. Ma. Govt. Death of the gardener | डॉ. मा. गो. माळी यांचे निधन

डॉ. मा. गो. माळी यांचे निधन

googlenewsNext

डॉ. माळी हे थोर साहित्यिक होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. राज्य शासनाच्या महात्मा फुले समग्र वाड:मय पुस्तक निर्मिती समितीवर सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काही वर्षे काम केले आहे. महात्मा जोतिबा फुले विश्वभारतीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारती संपादकीय विभागाचे अध्यक्ष होते. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

त्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचाराने वाटचाल केली. आपल्या जीवनात ते सत्यशोधक पद्धतीचे अनुकरण करत असत तसेच इतरांनाही अनुकरण करण्याचा आग्रह धरत असत.

सेवानिवृत्त उपअभियंता विजयराव माळी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Dr. Ma. Govt. Death of the gardener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.