डॉ. राजेश ख्यालाप्पा बेस्ट रिसर्चर अवॉर्डने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:44+5:302021-08-14T04:30:44+5:30

कसबा बावडा : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. राजेश ख्यालाप्पा यांना पदुचेरी येथे झालेल्या ...

Dr. Rajesh Khyalappa honored with Best Researcher Award | डॉ. राजेश ख्यालाप्पा बेस्ट रिसर्चर अवॉर्डने सन्मानित

डॉ. राजेश ख्यालाप्पा बेस्ट रिसर्चर अवॉर्डने सन्मानित

Next

कसबा बावडा :

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. राजेश ख्यालाप्पा यांना पदुचेरी येथे झालेल्या इंटरनॅशनल सायंटिस्ट अवाॅर्ड समारंभात 'बेस्ट रिसर्चर अवाॅर्ड'ने सन्मानित करण्यात आले.

पदुचेरी येथे ७ व ८ ऑगस्ट रोजी 'व्हीडी गुड टेक्नोलॉजी फॅक्टरी' तर्फे दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी व विज्ञान क्षेत्रातील 'इंटरनॅशनल सायंटिस्ट अवाॅर्ड'चे वितरण करण्यात आले. यामध्ये डॉ. राजेश ख्यालाप्पा यांना 'बेस्ट रिसर्चर अवाॅर्ड'ने सन्मानित करण्यात आले. डॉ. ख्यालाप्पा हे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

.

फोटो ओळी पदुचेरी : डॉ. राजेश ख्यालाप्पा यांना सन्मानित करताना 'व्हीडी गुड'चे पदाधिकारी.

Web Title: Dr. Rajesh Khyalappa honored with Best Researcher Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.