शिवाजी विद्यापीठाचे डॉ. पी. एस. पाटील ठरले जागतिक ‘टॉप-१५०’ संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:01+5:302021-07-10T04:18:01+5:30

कोल्हापूर : फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक ...

Dr. Shivaji University. P. S. Patil became the world's top '150' researcher | शिवाजी विद्यापीठाचे डॉ. पी. एस. पाटील ठरले जागतिक ‘टॉप-१५०’ संशोधक

शिवाजी विद्यापीठाचे डॉ. पी. एस. पाटील ठरले जागतिक ‘टॉप-१५०’ संशोधक

Next

कोल्हापूर : फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत ‘टॉप-१५०’मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१’मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.

डॉ. पी. एस. पाटील यांची मटेरिअल सायन्स, नॅनोसायन्स, फोटोकॅटॅलिसिस, सोलर सेल डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांतील संशोधनासाठी जगभरातील आघाडीच्या संशोधकांमध्ये गणना केली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दोन टक्के संशोधकांमध्येही त्यांचे नाव आघाडीवर होते. ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्येही ते अग्रस्थानी होते. २०१६ ते २०२१ या कालावधीतील ‘स्कोपस’ डाटाच्या आधारे केवळ फोटोकॅटॅलिसिस व सोलर सेल क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या ५०० संशोधकांचा समावेश असणारा ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’ जाहीर करण्यात आला. या यादीमध्ये डॉ. पी. एस. पाटील हे १४७व्या स्थानी आहेत. त्यांच्यावर १३१व्या स्थानी ओडिशा येथील आय.टी.ई.आर. शिक्षा ‘ओ’ अनुसंधान या संस्थेचे डॉ. के.एम. परिदा हे आहेत. भारतीय संशोधकांच्या यादीत डॉ. पारिदा हे प्रथम स्थानी तर डॉ. पाटील हे द्वितिय स्थानी आहेत.

प्रतिक्रिया

संशोधन क्षेत्रात सातत्याने आघाडी

प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील

गेल्या अनेक वर्षांत शिवाजी विद्यापीठ हे फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट या क्षेत्रांमध्ये भरीव संशोधन करीत आहे. या संशोधन क्षेत्रात सातत्याने आघाडी टिकवून आहे. या पुढील काळातही व्यक्तीगत स्तरावर तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संशोधन परंपरा अखंडित पुढे चालवित राहणे महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया

विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

डॉ. पी. एस. पाटील यांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी अभिनंदनीय आहे. त्यांच्या बरोबरीने विद्यापीठाच्या अन्य सात संशोधकांनीही देशातल्या आघाडीच्या ५०० संशोधकांत स्थान मिळविले, यातूनही विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा सिद्ध होतो.

काय आहे ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’?

'एल्सव्हिअर-सायव्हॅल’ ही वेब-बेस्ड संशोधन विश्लेषण प्रणाली असून २३० देशांतील सुमारे २० हजार शैक्षणिक व संशोधन संस्था आणि तेथे कार्यरत असणारे संशोधक यांचा लेखाजोखा या प्रणालीद्वारे मांडला जातो. संशोधन प्रवास, प्रवाह, नवसंशोधनाची सांगड अशा अभिनव पद्धतीने विश्लेषण करुन संशोधकांना पुरविले जाते. जगातल्या पाच हजारांहून अधिक प्रकाशनांच्या २२ हजारांहून अधिक संशोधन पत्रिकांचे विश्लेषण केले जाते.

फोटो: ०९०७२०२१-कोल-डॉ. पी. एस. पाटील

Web Title: Dr. Shivaji University. P. S. Patil became the world's top '150' researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.