डाॅ. किरण सूर्यवंशी यांच्या नैसर्गिक कलादालनाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:18+5:302021-02-08T04:21:18+5:30

व्यवसायाने डाॅक्टर परंतु लहानपणापासूनच चित्रकलेची आवड, निसर्ग सौंदर्याची गोडी व भटकंतीचा छंद असलेल्या किरण सूर्यवंशी यांनी झाडावरून ...

Dr. Unveiling of Kiran Suryavanshi's Natural Art Gallery | डाॅ. किरण सूर्यवंशी यांच्या नैसर्गिक कलादालनाचे अनावरण

डाॅ. किरण सूर्यवंशी यांच्या नैसर्गिक कलादालनाचे अनावरण

Next

व्यवसायाने डाॅक्टर परंतु लहानपणापासूनच चित्रकलेची आवड, निसर्ग सौंदर्याची गोडी व भटकंतीचा छंद असलेल्या किरण सूर्यवंशी यांनी झाडावरून गळून पडलेली पाने, फुले आदी शुष्क नैसर्गिक गोष्टींच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवून व विशेष म्हणजे कृत्रिम रंग व ब्रश यांचा वापर न करता विविध कलाकृती साकारल्या आहेत. या किरासू आर्ट कलाविष्काराचे अनावरण शिक्षण समिती कसबा नेसरीचे संचालक तथा माजी प्राचार्य विठ्ठल सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले तर किरासू आर्ट WWW.Kirasuart.com वेबसाईटचे उद्घान वेब डिझायनर गिरीश बारसकर यांच्या हस्ते झाले.

किरासू आर्ट कलाविष्कारच्या माध्यमातून किरासू आर्ट लोगो, संगीतमय व दृकश्राव्य स्थितीतील रचना वेबसाईट, ३६० फोटोग्राफीचे असलेल्या दालनाचे ऑनलाईन चित्र प्रदर्शन लोकांसाठी आज खुले करण्यात आले. या अनोख्या चित्रकलेचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी लवकरच मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करणार असल्याचीही माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

यावेळी फिरोज शेख, ऐश्वर्य मालगावे, शैलेश बोंगाळे, अमोल शिंदे, सुनील सुतार, बाळासाहेब परितकर, धनाजी सुतार, विजया सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी, सतीश सावंत, रमण लोहार, नंदकुमार वाईंगडे, अनिल पाटील यांच्यासह कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते. डाॅ. मंगल सूर्यवंशी यांनी आभार मानले.

----------

फोटो ओळी नेसरी : डाॅ. किरण सूर्यवंशी यांच्या वैश्विक दालन कलाकृती ‘किरासू आर्ट’च्या अनावरणन प्रसंगी माजी प्राचार्य विठ्ठल सूर्यवंशी, डाॅ. किरण सूर्यवंशी, विजया सूर्यवंशी, फिरोज शेख, ऐश्वर्य मालगावे, शैलेश बोंगाळे, गिरीश बारसकर आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Unveiling of Kiran Suryavanshi's Natural Art Gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.