कमला कॉलेजमध्ये डॉ.व्ही.टी. पाटील यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:11+5:302021-08-14T04:28:11+5:30
‘५६ महाराष्ट्र बटालियन’तर्फे स्वच्छता मोहीम कोल्हापूर : येथील ५६ महाबटालियन एनसीसी कोल्हापूरअंतर्गत वाय. सी. केएमसी कॉलेज आणि गोखले ...
‘५६ महाराष्ट्र बटालियन’तर्फे स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : येथील ५६ महाबटालियन एनसीसी कोल्हापूरअंतर्गत वाय. सी. केएमसी कॉलेज आणि गोखले कॉलेजच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्मा पार्कमधील पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यात स्वामी विवेकानंद, कॅप्टन शंकरराव वालावलकर या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी एनसीसी कॅडेट यांनी योगदान दिले. या उपक्रमाचे नियोजन लेफ्टनंट डॉ. अमित रेडेकर, प्रा. डी. के. नरळे यांनी केले. त्यांना ५६ महाबटालियनचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल विजयंत थोरात आणि महाविद्यालयातील प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (१३०८२०२१-कोल-स्वच्छता मोहीम) : कोल्हापुरातील हुतात्मा पार्कमधील पुतळ्यांची स्वच्छता केएमसी कॉलेज आणि गोखले कॉलेजमधील एनसीसी कॅडेटनी केली.
बोंद्रेनगरातील गणेश पार्कमध्ये वृक्षारोपण
कोल्हापूर : राज्य नाभिक महामंडळाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी बोंद्रेनगर येथील गणेश पार्कमध्ये वनरक्षक विक्रम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अनिल कदम, भाऊ पाताडे, गौरव बचाटे, प्रकाश शिंदे, सुरेश गुडाळकर, धोंडीराम चव्हाण, समीर मुल्ला, आदी उपस्थित होते.