दरेवाडीतील मानवी वस्तीत अजगर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:00 PM2019-09-21T13:00:52+5:302019-09-21T13:03:22+5:30

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथे गवताच्या शेतात आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात ...

A dragon was found in a human settlement in the doorway | दरेवाडीतील मानवी वस्तीत अजगर सापडला

दरेवाडीतील मानवी वस्तीत अजगर सापडला

googlenewsNext
ठळक मुद्देदरेवाडीतील मानवी वस्तीत अजगर सापडलासलग तीन वर्ष तीन अजगर सापडल्याने नागरीकांच्यात भीती

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथे गवताच्या शेतात आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.साधारणता नऊ फूट लांबीचा आणि १५ किलो वजनाचा हा अजगर अन्नाच्या शोधात लोकवस्तीत आला होता. याच परिसरात सलग तीन वर्ष तीन अजगर सापडल्याने नागरीकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुर्मिळ असणाऱ्या अजगराला बघायला लोकांची गर्दी झाली होती.

शनिवारी सकाळी दरेवाडी येथील अशोक शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या गवताच्या शेतात अजगर आढळून आला.त्यानंतर त्यांनी पोर्ले तर्फ ठाणे येथील सर्पमित्र दिनकर चौगुले, सुरेश चेचर, कृष्णात सातपूते आणि सागर चौगुले यांनी त्याला पकडले.

अजगराला वनविभागाचे वनरक्षक ए.व्ही.ठोंबरे व त्यांच्या सहकार्याकडे देण्यात आले. पन्हाळा परिसरात अजगराचा अधिवास असणाऱ्या खडकाळ भागात अजगराला सुरक्षित सोडण्यात आले. सलग तीन वर्ष अन्नाच्या शोधात लोकवस्तीत आलेल्या अजगराच्या दर्शनामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याला कारणीभूत म्हणजे वाढती वृक्षतोड आणि वन्यविभागाने लावलेली विदेशी जातीच्या झाडांची वृक्षलागवड होय. विदेशी जातीच्या झाडांचा सहवास वन्यप्राण्यांसाठी उपयुक्त नसल्याने या झाडांच्या सानिध्यात अन्नसाखळीतील प्राणी थांबत नाही.त्यामुळेच अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करणाऱ्या वन्यप्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोचनीय आहे.

Web Title: A dragon was found in a human settlement in the doorway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.