मिरज-शिरोळ मार्गावरील ड्रेनेजचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:18+5:302021-09-03T04:24:18+5:30

अर्जुनवाड : येथील मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील मिरज-शिरोळ रस्त्यावरील आर. सी. सी. गटाराचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम गुरुवारी दुपारी ...

Drainage work on Miraj-Shirol road was stopped | मिरज-शिरोळ मार्गावरील ड्रेनेजचे काम बंद पाडले

मिरज-शिरोळ मार्गावरील ड्रेनेजचे काम बंद पाडले

Next

अर्जुनवाड : येथील मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील मिरज-शिरोळ रस्त्यावरील आर. सी. सी. गटाराचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम गुरुवारी दुपारी ग्रामस्थांनी बंद पाडले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देऊन हे काम पाडून पुन्हा करण्याचे आदेश दिले.

अर्जुनवाड येथील छत्रपती शिवाजी चौकात मिरज-शिरोळ रस्त्याचे काम सुरू आहे. ढवळे यांच्या हॉटेलसमोर आर. सी. सी गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर हे काम तत्काळ बंद करून जयसिंगपूर बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यांनी भेट देऊन आर. सी. सी.चे काम पाडून नव्याने आराखड्यानुसार बांधण्यास सांगितले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराकडून बऱ्याच ठिकाणी निकृष्ट काम केल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय आराखड्याप्रमाणे काम न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या ठेकेदाराने केलेल्या कामाची पहाणी करून योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे सुरू असलेले आर. सी. सी. गटाराचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले.

Web Title: Drainage work on Miraj-Shirol road was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.