नाटक व कला जगण्यास दिशा देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:06+5:302020-12-29T04:24:06+5:30

राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नाटक तसेच अन्य कोणतीही कला ही आपल्या जगण्यास ...

Drama and art give direction to life | नाटक व कला जगण्यास दिशा देणारी

नाटक व कला जगण्यास दिशा देणारी

googlenewsNext

राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नाटक तसेच अन्य कोणतीही कला ही आपल्या जगण्यास दिशा देणारी असते. अशा प्रकारच्या कलेच्या सादरीकरणासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होते आणि अनेक नवोदित कलाकारांचा विकास घडतो. ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असे उद्गार नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी काढले.

येथील २२ व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून नटराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या स्पर्धा मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अ‍ॅण्ड रिसर्च फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने आयोजित केल्या आहेत.

रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष संजयसिंह गायकवाड यांनी स्वागत व मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. एस. पी. मर्दा, विजयकुमार नाईक (गोवा), राज कुबेर (पुणे), प्राची गोडबोले (सांगली), राजगोपाल मर्दा, श्रीकांत फाटक, आदी उपस्थित होते. संजय होगाडे यांनी आभार मानले. या स्पर्धा घोरपडे नाट्यगृहात आयोजित केल्या आहेत.

(फोटो ओळी)

२७१२२०२०-आयसीएच-०२

इचलकरंजीत २२ व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दीप प्रज्वलित करून केले. यावेळी डॉ. एस. पी. मर्दा, विजयकुमार नाईक, राज कुबेर, प्राची गोडबोले, आदी उपस्थित होते.

Web Title: Drama and art give direction to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.