एकांकिकांनी नाट्य महोत्सवास प्रारंभ -आज ऱ्हासपर्वचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:51+5:302021-03-13T04:45:51+5:30

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित मनोहर कुईगडे स्मृती हौशी नाट्य महोत्सवाचा पडदा शुक्रवारी शेवट तितका ...

Drama Festival begins with one-act play - Aaj Rhasparva's experiment | एकांकिकांनी नाट्य महोत्सवास प्रारंभ -आज ऱ्हासपर्वचा प्रयोग

एकांकिकांनी नाट्य महोत्सवास प्रारंभ -आज ऱ्हासपर्वचा प्रयोग

googlenewsNext

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित मनोहर कुईगडे स्मृती हौशी नाट्य महोत्सवाचा पडदा शुक्रवारी शेवट तितका गंभीर नाही’ व ‘जंगल जंगल बटा चला हैं’ या दोन एकांकिकांनी उघडला. यानिमित्ताने कोरोनाच्या आपत्तीनंतर रसिकांना नाटकांचा आस्वाद घेता आला.

दिलीप गुणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी लेखक विद्यासागर अध्यापक व अभिनेते प्रभाकर वर्तक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर इरफान मुजावरलिखित ‘शेवट तितका गंभीर नाही’ व राहुल सडोलीकरलिखित ‘जंगल जंगल बटा चला है’ या दोन एकांकिका सादर झाल्या. महोत्सवात शनिवारी परिवर्तन कला फाउंडेशननिर्मित ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा विशेष प्रयोग होणार आहे. या नाटकाने २०१८ च्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक मिळविला, तसेच विविध पारितोषिकांवर मोहर उमटविली आहे.

--

फोटो नं १२०३२०२१-कोल-नाट्य महोत्सव

ओळ : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित नाट्य महोत्सवात शुक्रवारी सादर झालेल्या ‘जंगल जंगल बटा चला हैं’ एकांकिकेतील एक प्रसंग.

---

Web Title: Drama Festival begins with one-act play - Aaj Rhasparva's experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.