इचलकरंजी विषय समित्या निवडीत नाट्यमय कलाटणी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:08 AM2018-01-05T01:08:46+5:302018-01-05T01:08:53+5:30
इचलकरंजी : नगरपालिकेच्या आज, शुक्रवारी होणाºया विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या स्वतंत्र बैठका झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर येथे नसल्यामुळे सत्तारूढ आघाडीचा कोणताही निर्णय झाला नाही. दिल्लीहून हाळवणकर परत येताच त्यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी होणाºया बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. अशा पार्श्वभूमीवर विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीची ‘वेट अँड सी’ अशी भूमिका असली तरी त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
नगरपालिकेमध्ये भाजपाच्या नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी निवडून आल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपा, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस अशी आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा व बांधकाम या दोन समित्या देण्यात आल्या, तर ताराराणी आघाडीकडे उपनगराध्यक्षपद देऊन पुढील वर्षी (यंदा) पाणीपुरवठा व आरोग्य समिती देण्यात येईल, असा फॉर्म्युला ठरला होता.
मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसकडून पाणीपुरवठा व बांधकाम या दोन्ही समित्या आपल्याकडेच राहाव्यात, असा आग्रह कायम ठेवण्यात आला आहे.गुरुवारी सायंकाळी सत्तारूढ आघाडीचे मार्गदर्शक बादशहा बागवान यांच्या उपस्थितीत ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद सागर चाळके व राष्टÑवादी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद अशोकराव जांभळे यांची बैठक झाली. बैठकीमध्ये ताराराणी आघाडीला पाणीपुरवठा व आरोग्य समिती देण्याचे ठरले असल्याचे बागवान यांनी सांगितले. मात्र, जांभळे यांनी या दोन समित्या राष्टÑवादी कॉँग्रेसकडेच राहतील. त्याबाबत अंतिम निर्णय आमदार हाळवणकर घेतील, असे सांगून ते बैठकीतून उठून गेले.
अशा घडामोडी घडत असताना राष्टÑीय कॉँग्रेस व राजर्षी शाहू आघाडी या दोन्ही नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सर्व २८ नगरसेवक-नगरसेविकांनी रात्री स्नेहभोजन घेतले. आज, शुक्रवारच्या समित्यांच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीमध्ये होणाºया हालचालींवर लक्ष ठेवून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. परिणामी शुक्रवारी सकाळी नगराध्यक्षा स्वामी यांच्या घरी आमदार हाळवणकर व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये सत्तारूढ आघाडीच्या प्रमुखांच्या होणाºया बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्टÑवादी कॉँग्रेसकडून पाणीपुरवठा व बांधकाम या दोन्ही समित्या आपल्याकडेच राहाव्यात, असा आग्रह कायम
राष्टÑीय कॉँग्रेस व राजर्षी शाहू आघाडी या दोन्ही नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका