रिक्षाचालकांना ड्रेसकोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:43 AM2019-11-23T00:43:11+5:302019-11-23T00:43:19+5:30

कोल्हापूर : येथील रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहन परवाना, परमीट असल्याखेरीज व्यवसाय करू नये. ग्राहकांची लुबाडणूक करू नये. ...

Dress code for rickshaw operators | रिक्षाचालकांना ड्रेसकोड

रिक्षाचालकांना ड्रेसकोड

googlenewsNext

कोल्हापूर : येथील रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहन परवाना, परमीट असल्याखेरीज व्यवसाय करू नये. ग्राहकांची लुबाडणूक करू नये. पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांना दिल्या. तसेच रिक्षाचालकांनी एक जानेवारीपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक केले असून लायसन्स, बिल्ला सक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेत बैठकीचे आयोजन केले होते. १२ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांनीच सूचनांचा आदर करीत, रिक्षाचालकांच्या भल्यासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काहीजणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसेंजर घेणे यांसारख्या अनेक गोष्टी रिक्षा व्यावसायिकांसाठी वादग्रस्त ठरत आहेत.
रात्रीच्या वेळी मनाला येईल ते भाडे आकारणे, ग्राहकांशी वाद घालणे आणि मध्यरात्री रस्त्यात सोडणे अशा घटना घडल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबतचे नियोजन करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस विश्वास नांगरे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Dress code for rickshaw operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.