मंदिरांत जायचे असेल तर कपडे नीट घाला, एकाच जिल्ह्यात १९ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:41 AM2023-08-27T00:41:46+5:302023-08-27T00:42:16+5:30
घनवट म्हणाले, यापूर्वी देशभरातील अनेक मंदिरांमध्ये तसेच राज्यातील १६५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
काेल्हापूर : जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृतीला अनुसरून वस्त्र नेसून या मंदिरांमध्ये भाविकांनी येणे गरजेचे आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घनवट म्हणाले, यापूर्वी देशभरातील अनेक मंदिरांमध्ये तसेच राज्यातील १६५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू
करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील १२ व मलकापूरमधील ३, हुपरीतील ३ व तळंदगे येथील १ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्तिस्वातंत्र्य असू शकत नाही.