फलाटाला गाडी लावण्यावरून कृत्य मेढा आगाराच्या चालकाला विजयपूरमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:26 AM2019-11-23T11:26:49+5:302019-11-23T11:28:27+5:30

ही माहिती समजल्यावर विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी याची गांभीर्याने दखल घेत विजयपूरच्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला. संबंधित गाडीला वाहतूक परवाना असून, कर्मचाºयाला केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला. यावेळी तेथील अधिकाºयाने दिलगिरी व्यक्त करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.

Driver of Medha Agar in Vijaypur | फलाटाला गाडी लावण्यावरून कृत्य मेढा आगाराच्या चालकाला विजयपूरमध्ये धक्काबुक्की

फलाटाला गाडी लावण्यावरून कृत्य मेढा आगाराच्या चालकाला विजयपूरमध्ये धक्काबुक्की

googlenewsNext
ठळक मुद्दे:- सातारा जिल्ह्यात पडसाद

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगारातील चालकाला कर्नाटकातील विजयपूर बसस्थानकात वाहतूक नियंत्रकाने धक्काबुक्की केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेचे सातारा जिल्ह्यात पडसाद उमटले असून सातारा, कºहाड, मिरजमध्ये कर्नाटक परिवहनच्या गाड्या एसटी कर्मचाऱ्यांनी रोखल्या. दरम्यान, साताºयाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनीही विजयपूरच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निषेध नोंदविला.

याबाबत माहिती अशी की, आंतरराज्य वाहतूक करारानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या कर्नाटक, आंध्रप्रदेशातील महत्त्वांच्या शहरांमध्ये प्रवासी वाहतूक करत असतात. या गाड्या व वेळेची आंतरराज्य करारानुसार नोंदणी केलेली असते. त्याचप्रमाणे कर्नाटकातूनही सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी या प्रमुख ठिकाणी गाड्या धावत असतात.

राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगारातून एसटी (एमएच १३ सीयू ७१५०) ही गाडी घेऊन चालक आशिष दादासाहेब नायकवडी व वाहक प्रतिभा कडू हे मेढा-विजयपूर ही कºहाड सांगलीमार्गे गुरुवारी गेले होते. विजयपूर बसस्थानकात चालक नायकवडी यांनी गाडी फलाटावर लावली होती. गाडी लवकर मार्गस्थ न केल्यामुळे तेथील वाहतूक नियंत्रक चिडला. नायकवडी हे गाडी सुरू करत असतानाच आत येऊन धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. नायकवडी यांची कॉलर पकडून तो खाली ओढत होता. तर नायकवडी काय झालं...ह्ण म्हणून विचारत होते. या घटनेचा एका व्यक्तीने व्हिडीओ बनवला असून, तो गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील एसटी कर्मचाºयांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला.

ही माहिती समजल्यावर विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी याची गांभीर्याने दखल घेत विजयपूरच्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला. संबंधित गाडीला वाहतूक परवाना असून, कर्मचाºयाला केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला. यावेळी तेथील अधिकाºयाने दिलगिरी व्यक्त करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.

महामार्गावरून वाहतूक
या घटनेचे पडसाद सातारा आगारात उमटले. कर्नाटकाच्या काही गाड्या कर्मचाºयांनी रोखल्या, हे समजल्यावर अनेक गाड्या दिवसभर महामार्गावर धावत होत्या.

 

ही घटना समजल्यानंतर तेथील विभाग नियंत्रकांना संपर्क साधून निषेध नोंदवत असतानाच सर्व गाड्या रोखून ठेवत असल्याचे सांगितले. याची दखल घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाºयावर कारवाई करणार असल्याचा व गाडीच्या वेळ निश्चितेचा मेलही पाठवून दिला आहे.
- सागर पळसुले
विभाग नियंत्रक सातारा.

Web Title: Driver of Medha Agar in Vijaypur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.