चालक वाहकांनी अशी दिली एस. टी. तील आजी-आजोबांना वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 05:54 PM2019-11-25T17:54:13+5:302019-11-25T18:13:09+5:30
एस. टी. ला जर प्रवाशी हवे असतील तर ही सौजण्याची वागणूक हवीच. अशीच प्रतिक्रीया प्रवाशांची होती.
कोल्हापूर : एस. टी. विभागाचे चालक वाहक अनेकदा प्रवाशांना चांगली वागणूक देत असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचा आणखी एक अनुभव रविवारी रात्री दौंड आगाराच्या एस. टी. बसच्या चालक-वाहकांचा आला.
रात्रीची ११ ची वेळ होती. दौंड आगाराची दौंड -कोल्हापूर (एस. टी. क्रमांक- एम. एच.-१४ बी. टी. ३४३६ ) ही कोल्हापूरकडे येत होती. यामध्ये वयोवृद्ध आजी-आजोबा बसले होते. त्यांना इस्लामपूर च्या पेठ नाक्याजवळील स्टॉपवर उतराचे होते. परंतु लांब पल्ल्याची एस. टी. बस असल्याने ती थेट मुख्य महामार्गावरील पुलावरून जाणार होती.
ती सर्व्हिस रोडवरून खाली येऊ शकत नव्हती. परंतु यावेळा रात्री या आजी-आजोबांना कोणी मदत करणार नाही, रिक्षा किंवा अन्य कोणतेही वाहन मिळणार नाही म्हणून त्यांना वाहक संतोष मोहोळकर यांनी चालक नवनाथ थोरे यांच्याशी संपर्क साधून एस. टी. बस थोडीशी मुख्य पुलावरील रस्ता सोडून खालील रस्त्यावर घेण्यास सांगितले. त्यांना व्यवस्थित व सुरक्षितरित्या इस्लामपूर- पेठनाका रस्त्यावर सोडले, यावेळी मात्र त्या आजी-आजोबांनी वाहक व चालकांचे आभार मानले. अवघ्या २ मिनिटाचा हा प्रसंग व पुन्हा मुख्य रस्त्यावर ही एस. टी. बस धावू लागली.
याविषयी वाहकाला विचारले अशी मुख्य मार्गावरून ही एस. टी. बस या शेजारील मार्गावर का आणली असे विचारले असता, वाहक मोहळकर म्हणाले अहो रात्रीची वेळ. त्यांना कोणी त्रास देऊन नये. तसेच त्यांना चालावेही खूप लागले असते. ते सुरक्षित व व्यवस्थित त्यांच्या इच्छित स्थळी जावे म्हणून ही मदत केली. बस्स.. यावरून मात्र आजही एस. टी. बसचे चालक-वाहक प्रवाशांबरोबर सौजण्याने वागत असल्याचे दिसून आले. एस. टी. ला जर प्रवाशी हवे असतील तर ही सौजण्याची वागणूक हवीच. अशीच प्रतिक्रीया प्रवाशांची होती.