अब्दुललाटमध्ये महिलांकडून दारूअड्डे उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:39+5:302021-03-13T04:43:39+5:30

अब्दुललाट : येथे महिला दिनानिमित्त अवैधरीत्या सुरू असलेले दारूअड्डे व मटका अड्डे महिलांनी उद्ध्वस्त केले. सलग दोन दिवस चाललेल्या ...

Drug raids by women in Abdullat | अब्दुललाटमध्ये महिलांकडून दारूअड्डे उद‌्ध्वस्त

अब्दुललाटमध्ये महिलांकडून दारूअड्डे उद‌्ध्वस्त

Next

अब्दुललाट : येथे महिला दिनानिमित्त अवैधरीत्या सुरू असलेले दारूअड्डे व मटका अड्डे महिलांनी उद्ध्वस्त केले. सलग दोन दिवस चाललेल्या महिलांच्या कामगिरीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. परत हे धंदे सुरू झाले तर कोणतीही पूर्वसूचना न देता हल्लाबोल करण्याचा इशारा दिला. या घटनांमुळे पोलिसांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

८ मार्चला सेवांकुर साखर शाळेमध्ये श्रमशक्ती परिवाराच्या वतीने ऊसतोड महिला कामगारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. तो कार्यक्रम संपल्यानंतर साखर शाळेच्या मागील बाजूस दारूअड्डा आहे. महिला तेथे जाऊन तेथील साहित्य जाळून टाकले. त्यानंतर महिलांनी तलावाशेजारी सुरू असलेल्या दारूअड्ड्यात घुसून तेथील बाटल्या बाहेर आणून जाळल्या.

नेताजी क्रीडा मंडळानजीक असलेल्या दोन मटका अड्ड्यांवरील साहित्य आणि चिठ्ठ्या बाहेर आणून जाळल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीसमोर आंदोलनकर्त्या व पोलिस यांची चर्चा झाली. चर्चेमध्ये दारू, मटका व अवैध व्यवसाय सुरू आहेत. तरीही कुरुंदवाड पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप श्रमशक्ती परिवाराच्या अध्यक्षा जयश्री पाटील यांनी केला. त्यावर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी अश्विनी कांबळे, मंगल माळी, मीना मुळे, स्मिता काळे, कुंदा बडबडे, भारती कुरणे, आप्पा पाटील, मोहन कांबळे, विनायक माळी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

११०३२०२१-आयसीएच-०६

अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे महिलांनी सलग दोन दिवस दारूअड्डे उद्ध्वस्त करून तेथील बाटल्या जाळून टाकल्या.

Web Title: Drug raids by women in Abdullat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.