बिश्णोई गँगकडून ड्रग्सची तस्करी, राजस्थान, हुबळी ते पुणे कनेकशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:57 PM2020-01-29T17:57:17+5:302020-01-29T18:05:01+5:30
पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर पोलीसांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या राजस्थानमधील दोघा गँगस्टारच्या प्रकृत्तीत सुधारणा झाली आहे. ००७ या नावाने ही गँग राजस्थानमध्ये कार्यरत आहे. त्यांचा म्होरक्या शामलाल पुनिया उर्फ बिश्णोई आहे. या गँगकडून राजस्थान, हुबळी ते पुणे अशी ड्रग्सची तस्करी केली जात होती. राजस्थानमध्ये पोलीसांना अनेक गुन्'ात हे गँगस्टार हवे होते.
कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर पोलीसांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या राजस्थानमधील दोघा गँगस्टारच्या प्रकृत्तीत सुधारणा झाली आहे. ००७ या नावाने ही गँग राजस्थानमध्ये कार्यरत आहे. त्यांचा म्होरक्या शामलाल पुनिया उर्फ बिश्णोई आहे. या गँगकडून राजस्थान, हुबळी ते पुणे अशी ड्रग्सची तस्करी केली जात होती. राजस्थानमध्ये पोलीसांना अनेक गुन्'ात हे गँगस्टार हवे होते.
वडगाव पोलीस ठाण्यात गँगवर गुन्हा दाखल केला असून त्यांचे पुण्यामध्ये कोणाशी कनेकशन आहे, त्याचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सीपीआरमध्ये पोलीस बंदोबस्तात जखमी शामलाल गोवर्धनराम पुनिया उर्फ बिश्णोई (वय २४, रा. भोजासर, जि. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू उर्फ बिश्णोई (२४, रा. विष्णुनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोथपूर) यांचेवर उपचार सुरु आहेत.
तिसरा साथीदार कारचालक श्रीराम पांचाराम बिश्णोई (२३, रा. बेटलाईन जोथपूर) हा वडगाव पोलीसांच्या ताब्यात आहे. शाम पुनिया याचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, बेकायदेशीर आर्मस बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे एकूण १२ तर श्रवणकुमार याचेवर दोन व श्रीराम मांजु याचेविरुध्द १९ गुन्हे दाखल आहेत.
या तिन्ही गुन्हेगारांवर महानिरीक्षक जोधपूर यांनी पकडून देणाऱ्यास प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तसेच शामलाल पुनिया याचेवर अतिरीक्त महानिर्देशक पोलीस अपराध शाखा राजस्थान यांनी २० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. राजस्थान पोलीस या गँगच्या मागावर होते.
राजस्थानचे पोलीस कोल्हापूरात
राजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी नरेंद्र पुनिया पथकासह कोल्हापूरात आले आहेत. त्यांचेसोबत बोजासार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिसिंह राजपुरोहित, श्रवणकुमार, देवाराम बिश्णोई, मोहन राय, शेवान राय यांचा समावेश आहे. त्यांनी सीपीआरमध्ये जखमी शामलाल व श्रवणकुमार यांचे भेट घेवून चौकशी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचेशी चर्चा केली. वडगाव पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या श्रीराम बिश्णोई याचेकडे या पथकाने चौकशी केली.
बिश्णोई गँगच्या विरोधात राजस्थान-जोधपूर मध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गँगचा हुबळी येथून आम्ही पाठलाग करीत होतो. अतिशय धाडसाने कोल्हापूर पोलीसांनी या गँगच्या म्होरक्यासह तिघांना पकडले आहे. न्यायालयाचे मंजूरीने त्यांचा ताबा लवकरच आम्ही घेवून जोधपूरला रवाना होणार आहे.
नरेंद्र पुनिया,
राजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी.