गडाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्यांना हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:18 AM2021-07-18T04:18:28+5:302021-07-18T04:18:28+5:30

अधिक माहिती अशी की, शनिवारी येळ्ळूर राजहंस गडाच्या पायथ्याशी काही तरुण मद्यपान करत असल्याची माहिती स्थानिक युवक आणि शिवभक्तांना ...

The drunkards were chased away from the fort | गडाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्यांना हाकलले

गडाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्यांना हाकलले

Next

अधिक माहिती अशी की, शनिवारी येळ्ळूर राजहंस गडाच्या पायथ्याशी काही तरुण मद्यपान करत असल्याची माहिती स्थानिक युवक आणि शिवभक्तांना मिळाली. तेव्हा मनोज केरवाडकर, सोमनाथ नावगेकर, सागर कुंडेकर, मोनेश्री थोरात, नारायण कुंडेकर व इतर शिवभक्तांनी त्या मद्यपी युवकांच्या टोळक्याला गाठले. टोळक्याला शिवभक्त आणि धारेवर धरून चांगलाच दम भरला. तसेच गड-किल्ल्यावर पुन्हा अशाप्रकारचे कोणतेही गैरवर्तन होणार नाही, अशी हमी घेत हाकलून लावत चांगलाच धडा शिकवला. यापुढे राजहंस गडावर किंवा त्याच्या पायथ्याशी कोणीही दारू पार्टी आणि मांसाहार करू नये. असे प्रकार कोणी करताना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा स्थानिक शिवभक्त युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

खानापुरातील पर्यटन स्थळे सुट्टीच्या दिवशी बंद!

कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या उद्देशाने खानापूर तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवसांसह सार्वजनिक सुट्टीच्यादिवशी पर्यटकांना बंदी असणार आहे.

खानापूरच्या तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी तसा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आपत्ती निवारण कायदा आणि कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्यान्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील चिखले, चिगुळे, पारवाड, कणकुंबी, मान आदी पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी शनिवार आणि रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्यादिवशी बंद असतील. याची पर्यटक व नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी केले आहे.

Web Title: The drunkards were chased away from the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.