मांसाहारासाठी मद्यपी मुलाची वडिलांना मारहाण, गुन्हा दाखल; कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Published: October 28, 2023 01:19 PM2023-10-28T13:19:59+5:302023-10-28T13:23:04+5:30

कोल्हापूर : 'मला मांसाहार खायचे आहे. आत्ताच्या आत्ता आणून द्या,' असे म्हणत मद्यपी मुलाने वडिलांना मारहाण केली. हा प्रकार ...

Drunken son beats father for eating meat, case registered; Incidents in Kolhapur | मांसाहारासाठी मद्यपी मुलाची वडिलांना मारहाण, गुन्हा दाखल; कोल्हापुरातील घटना

मांसाहारासाठी मद्यपी मुलाची वडिलांना मारहाण, गुन्हा दाखल; कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : 'मला मांसाहार खायचे आहे. आत्ताच्या आत्ता आणून द्या,' असे म्हणत मद्यपी मुलाने वडिलांना मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास गजानन महाराज नगर येथे घडला. याबाबत गणेश हिंदुराव लोखंडे (वय ६२, रा. गजानन महाराज नगर, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी मुलगा विशाल गणेश लोखंडे (वय ४२) याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री विशाल लोखंडे हा दारूच्या नशेत त्याच्या घरी पोहोचला. त्याने वडिलांकडे मांसाहार खाण्याचा आग्रह धरला. वडिलांनी नकार दिल्याने दारूच्या नशेतील मुलाने पातेल्याने त्यांच्या डोक्यावर आणि पायावर मारहाण केली. मारहाणीत गणेश लोखंडे जखमी झाले. वारंवार मुलाकडून होणा-या त्रासाला कंटाळून अखेर वडिलांनी त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली.

Web Title: Drunken son beats father for eating meat, case registered; Incidents in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.