वाळवे खुर्दचा डॉक्टर ट्रॅक्टरच्या धडकेत ठार

By admin | Published: December 26, 2016 12:57 AM2016-12-26T00:57:30+5:302016-12-26T00:57:30+5:30

इस्पुर्लीतील रुग्णवाहिकेवरील आरोग्य अधिकारी

Druva Khurd doctor dies in a tractor crash | वाळवे खुर्दचा डॉक्टर ट्रॅक्टरच्या धडकेत ठार

वाळवे खुर्दचा डॉक्टर ट्रॅक्टरच्या धडकेत ठार

Next

कोल्हापूर : इस्पुर्ली (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात डॉ. रविराज विश्वनाथ आसबे (वय ३०, रा. वाळवे खुर्द, ता. कागल) हे ठार झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचा मृत्यू झाला होता.
डॉ. रविराज आसबे हे इस्पुर्ली येथील १०८ रुग्णवाहिकेवर आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता जेवणाचा डबा आणण्यासाठी पेट्रोल पंपाजवळील हॉटेलमध्ये निघाले होते. त्यावेळी गारगोटीकडे जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरशी धडक होऊन त्यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नागरिकांनी सीपीआरमध्ये आणले. परंतु, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व वाळवेतील मित्रपरिवाराने सीपीआर परिसरात गर्दी केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व चार महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. त्यांचे वडील विश्वनाथ आसबे जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवत्ती घेतली आहे. डॉ. आसबे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Druva Khurd doctor dies in a tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.