बाबासाहेब पवारांमुळे विवेकानंद संस्थेचे कार्य दूरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:25+5:302021-07-02T04:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रूकडी माणगाव : बाबासाहेब पवार यांच्यासारख्या सेवकांमुळे विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्य दूरवर पोहोचले आहे. पवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रूकडी माणगाव : बाबासाहेब पवार यांच्यासारख्या सेवकांमुळे विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्य दूरवर पोहोचले आहे. पवार यांनी संस्थेत काम असताना निष्ठा आणि प्रामाणिकपणा जोपासल्याचे प्रतिपादन विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक रामचंद्र भोजकर यांनी केले. माणगाव येथे विवेकानंद शिक्षण संस्थेचे सेवक बाबासाहेब पवार यांच्या सेवानिवृत्त समारंभ प्रसंगी ते बोलत होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे सरपंच डाॅ. राजू मगदूम होते.
सरपंच मगदूम म्हणाले, विवेकानंद शिक्षण संस्था नेहमी स्थानिक पातळीवर सहकार्य करत असते. ग्रामपंचायत माणगाव शाळेत सुरू केलेल्या कोविड सेंटरला सर्व सहकार्य करत आहेत. यामध्ये पवार यांच्यासारख्या सेवकांचे मोठे योगदान आहे.
सेवानिवृत्त सेवक बाबासाहेब पवार यांचा सपत्निक सन्मान आजीव सेवक भोजकर, सरपंच राजू मगदूम, मुख्याध्यापिका एम. व्ही. कदम यांच्याहस्ते झाले.
सेवक पवार यांनी सेवानिवृत्तीनंतरही प्रशालेस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
मुख्याध्यापिका कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य प्रकाश पाटील, अभिजित घोरपडे, विजय शेटे, प्रवीण पाटील, एम. ए. घाटगे उपस्थित होते. प्रकाश बिरनाळे यांनी आभार मानले.
फोटो : सेवानिवृत्त सेवक बाबासाहेब पवार यांचा सन्मान रामचंद्र भोजकर यांच्याहस्ते झाला. यावेळी सरपंच राजू मगदूम, एम. व्ही. पवार उपस्थित होते.