बाबासाहेबांमुळे भारताची एकता, अखंडता अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:59+5:302021-04-19T04:20:59+5:30
कोल्हापूर : भारताची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील परराष्ट्र व संरक्षणविषयक कलमांद्वारे ...
कोल्हापूर : भारताची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील परराष्ट्र व संरक्षणविषयक कलमांद्वारे अत्यंत कुशलतेने केले आहे. त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक विचारांकडे देशाने सजगपणाने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास अधिविभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी बुधवारी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय संरक्षणविषयक विचार’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेमध्ये बाबासाहेबांचे योगदान या विषयाचा सविस्तर अभ्यास करण्याकरिता विद्यापीठाच्यावतीने एक विशेष प्रकल्प हाती घेईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव, आर.व्ही. गुरव, प्राचार्य हरिश भालेराव, तृप्ती करेकट्टी, पी.एस. कांबळे, के.डी. सोनावणे, एन.बी. गायकवाड, रवींद्र श्रावस्ती, दीपा श्रावस्ती, अमोल मिणचेकर उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी परिचय करून दिला. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले.
फोटो (१८०४२०२१-कोल-विजय खरे (विद्यापीठ)
===Photopath===
180421\18kol_1_18042021_5.jpg
===Caption===
फोटो (१८०४२०२१-कोल-विजय खरे (विद्यापीठ)