परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आता कूळवहिवाट

By admin | Published: July 23, 2014 10:25 PM2014-07-23T22:25:30+5:302014-07-23T22:30:24+5:30

सामान्यांना दिलासा : अनेक केसेस मार्गी लागण्याची शक्यता

Due to circumstantial evidences, | परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आता कूळवहिवाट

परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आता कूळवहिवाट

Next

रत्नागिरी : कूळवहिवाट अधिकार अभिलेखात अद्याप दाखल न झालेल्या बेदखल कूळवहिवाटदारांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपली कूळवहिवाट निश्चित करुन घेता येणार आहे. त्यामुळे आता बेदखल कुळवहिवाटदारांना दिलासा मिळणार आहे. यासाठी आता आवश्यक पुरावाजन्य कागदपत्र संबंधित तहसीलदारांकडे सादर करावी लागणार आहेत.
रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांची प्रकरणे निकाली काढण्याकरिता शासन महसूल व वन विभागाकडील १२ मे २००६ च्या परिपत्रकान्वये मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार कूळवहिवाट अद्याप अधिकार अभिलेखात दाखल न झालेल्या बेदखल कूळवहिवाटदारांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही आपली कूळवहिवाट निश्चित करुन घेता येणार आहे. मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम २००६नुसार कूळ म्हणून अधिकार सिध्द होण्यासाठी संबंधित अर्जदाराने कागदपत्र, पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
सतत १२ वर्षे जमीन कसत असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा, ही जमीन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, ती व्यक्ती सतत १२ वर्षांपासून जमीन कसत असल्याबाबत त्या गावाचा सरपंच, पोलीसपाटील किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि त्या व्यक्तिच्या जमिनीच्या लगत असलेल्या जमिनीचा लागवडदार यांचे ही जमीन त्या व्यक्तिच्या कब्जात असल्याबाबत आणि ती जमीन त्या व्यक्तीकडून १२ वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अखंडितपणे कसण्यात येत आहे, असे शपथपत्र. परिस्थितीजन्य पुरावा म्हणून मतदार यादीचा भाग, शिधापत्रिका, विजेचे बिल, त्याच गावातील घरपट्टीची पावती, कृषी उत्पन्नाच्या विक्री संबंधातील कोणतीही पावती, झाडे तोडण्याच्या किंवा गौण खनिजाचे उत्खनन करण्याच्या परवानगी बाबतची किंवा अशा जमिनीच्या संबंधातील मंजूर केलेल्या कोणत्याही परवानगी संबंधित अन्य कोणतीही कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील. या सर्व नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी उपलब्ध असलेली कोणतीही कागदपत्र ग्राह्य समजली जातील. या सुधारणेनुसार कुळाचे हक्क सिध्द होत असल्यास जमिनीच्या खरेदीची किंमत जमिनीच्या आकाराच्या २०० पट इतकी निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
-उपलब्ध कोणतीही कागदपत्र ग्राह्य समजली जाणार.
-जमिनीच्या खरेदीची किंमत जमिनीच्या आकाराच्या २०० पट इतकी निश्चित.
-मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २००६नुसार कूळ सिध्द होण्यासाठी पुरावे द्यावे लागणार.

Web Title: Due to circumstantial evidences,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.