कोरोनामुळे पन्हाळ्यातील ऐतिहासिक १५ मेपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:32+5:302021-04-17T04:24:32+5:30
: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारपासून ऐतिहासिक ...
: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारपासून ऐतिहासिक वास्तू १५ मेपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश संचालक एन.के. पाठक यांनी दिले. या आदेशाप्रमाणे पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व विभागाने १५ मेपर्यंत पर्यटकांना प्रवेशासाठी बंद केल्या असल्याचे विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले.
पन्हाळा हा ऐतिहासिक किल्ला आहे. येथे ऐतिहासिक वास्तूंना पर्यटक भेटी देतात. इतर किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांचा व ऐतिहासिक वास्तू अभ्यासकांचा ओघ जास्त आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाचे आदेश प्राप्त होताच पुरातत्त्वच्या कोल्हापूर व कोकण विभागाचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी पन्हाळगडावरील सर्व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना प्रवेशासाठी बंद केल्याचे सांगितले. पन्हाळगडाबरोबरच देशातील ३६९१ ऐतिहासिक वास्तू १५ मेपर्यंत बंद राहणार आहेत.