कोरोनामुळे अंबाबाई मंदिरात शांतता, भाविकांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:27 PM2020-03-13T18:27:21+5:302020-03-13T18:28:48+5:30
इतके दिवस आपल्याकडे कोरोना-बिरोना काही नाही असे म्हणत असतानाच तीन दिवसांपूर्वी पुण्यात, पाठोपाठ मुंबई आणि कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या धास्तीने कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांची व भाविकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिरासह शहरातील पर्यटन स्थळे ओस पडली आहेत.
गेला दीड महिना चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने अलीकडेच युरोपीय राष्ट्रांमध्ये आणि आता भारतात शिरकाव केला आहे. इतके दिवस आपल्याकडे कोरोना-बिरोना काही नाही असे म्हणत असतानाच तीन दिवसांपूर्वी पुण्यात, पाठोपाठ मुंबई आणि कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. सोबतच भाविकांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले जात आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून अनेकांनी परगावी जाण्याचे टाळत घरीच बसण्यास पसंती दिली आहे.