जिल्हा बँकेमुळेच वाड्यावस्त्यांवर आर्थिक साक्षरता प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:06+5:302021-07-07T04:30:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात डोंगर-कपारीतील वाड्यावस्त्यांवर आर्थिक साक्षरतेचे काम प्रभावीपणे सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात डोंगर-कपारीतील वाड्यावस्त्यांवर आर्थिक साक्षरतेचे काम प्रभावीपणे सुरू झाले असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी काढले.
बारडवाडी (ता. राधानगरी) येथे आयोजित आर्थिक डिजिटल जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव होते.
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव म्हणाले, नाबार्डने जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम उद्दिष्टापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जात आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, जिल्हा बँकेने तंत्रज्ञानात गरुड झेप घेतलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांच्या वेळ व पैशाचा अपव्यय टाळून गतिमान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. संकपाळवाडी, पालकरवाडी, चांदेकरवाडी, चंद्रेपैकी गणेशवाडी, मोरेवाडी, तारळे खुर्द, घोटवडे, शिरगाव, येळवडे, आकनूर, धामोड, म्हासुर्ली, आडोली येथेही आर्थिक साक्षरता मेळाव्यामधून मार्गदर्शन करण्यात आले. विष्णूमामा बारड, सर्जेराव बारड, बळवंतराव बारड, रणजित पाटील, गीता पाटील, विजय तौदकर, शामराव पाटील व रमेश पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी : जिल्हा बँक व नाबार्डच्यावतीने बारडवाडी (ता. राधानगरी) येथे आयोजित आर्थिक डिजिटल जागृती कार्यक्रमात ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. (फोटो-०६०७२०२१-कोल-जिल्हा बँक)