दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

By admin | Published: April 24, 2017 01:04 AM2017-04-24T01:04:32+5:302017-04-24T01:04:32+5:30

‘रूसा’कडून मदत : शिवाजी विद्यापीठात साकारले समावेशी शिक्षण संसाधन केंद्र

Due to the education of the bright students of south Maharashtra | दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

Next



संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर
ई-बुक्स, ई-जर्नल्स, आॅडिओ बुक्स, ब्रेल प्रिंटिंग, आदी अद्ययावत तंत्रज्ञानावरील साधने असणारे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र (रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन) शिवाजी विद्यापीठात सुरू झाले आहे. या केंद्रामुळे दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण घेण्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रुसा) हे केंद्र साकारण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत सुमारे २५० दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यातील दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रेल लायब्ररी’ विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात कार्यान्वित आहे. या ब्रेल लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त अद्ययावत आणि अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. त्याला ‘रुसा’ने १५ लाख रुपयांच्या निधीद्वारे आर्थिक मदतीचा हात दिला. त्यातून ग्रंथालयात समावेशी शिक्षण संशोधन केंद्र साकारले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी साधने या केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली आहेत. शालेय ते महाविद्यालयीन पातळीवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘समावेश शिक्षण’ केंद्राचे सदस्यत्व मोफत दिले जाणार आहे. त्यांना इंटरनेटचा वापर, संगणक हाताळण्याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या साधनांची उपलब्धता
या केंद्रामध्ये ब्रेल पुस्तके, स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर असणारे संगणक, ब्रेल प्रिंटिंग, ई-बुक्स, ई-जर्नल्स, ई-डाटाबेसेस, ई-रिसोर्सेस, आॅडिओ बुक्स, वाय-फाय सुविधा, इंटरनेट, मॅग्निफायर, स्पेक्टॅकल्स, टेलिस्कोप, आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘रुसा’ने महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठासह शिवाजी कॉलेज अकोला, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) येथे या स्वरुपातील केंद्र साकारले आहे, शिवाय या केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये साकारले आहे.
अभ्यासक्रमाचे ‘ब्रेल लिपी’मध्ये रूपांतर
दिव्यांग (अंध, मूकबधिर, अस्थिव्यंगबाधित, गतिमंद) विद्यार्थ्यांसाठी हे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यापीठातील या केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञान असलेली साधने उपलब्ध करून दिली आहेत. अंध विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना अभ्यासक्रम, टेक्स्ट बुक हे ‘ब्रेल लिपी’ मध्ये रूपांतरीत करुन देण्याची सुविधा याठिकाणी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना संगणक वापरण्याचे प्रशिक्षण आणि त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

Web Title: Due to the education of the bright students of south Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.