मार्च एण्डमुळे सिलाई वर्ल्डमध्ये सर्व स्टॉक खरेदीपेक्षा कमी भावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:34+5:302021-03-18T04:23:34+5:30

सातारा : सिलाई वर्ल्डने मार्च एण्ड निमित्त स्टॉक क्लिअरन्स करण्याचे ठरविले आहे. सिलाईच्या ह्या निर्णयाचा ग्राहकांना अतिशय फायदा होणार ...

Due to the end of March, all the stocks in the sewing world are at a lower price than the purchase | मार्च एण्डमुळे सिलाई वर्ल्डमध्ये सर्व स्टॉक खरेदीपेक्षा कमी भावात

मार्च एण्डमुळे सिलाई वर्ल्डमध्ये सर्व स्टॉक खरेदीपेक्षा कमी भावात

Next

सातारा : सिलाई वर्ल्डने मार्च एण्ड निमित्त स्टॉक क्लिअरन्स करण्याचे ठरविले आहे. सिलाईच्या ह्या निर्णयाचा ग्राहकांना अतिशय फायदा होणार आहे. कारण आता पुढचे काही दिवस शोरूममधील सर्व स्टॉक हा खरेदीपेक्षा कमी भावात घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झालेली आहे. ही ऑफर रिंग रोड, टीव्हीएस शोरूमजवळ, फलटण येेथील शोरूममध्ये सुरु आहे.

साड्या, घागरा, पैठणी, शालू, डिझायनर साड्यांवर तब्बल ७५ टक्के सवलत देण्यात आलेली असून महिलांना किंमतीच्या केवळ २५ टक्के भरून आवडत्या साड्या खरेदी करता येणार आहेत. या सवलतीमुळे १४ हजार रुपयांची साडी फक्त ३५०० रुपये, ५७९४ किमतीची साडी केवळ रु. १४५० आणि २४९५ रुपयांची साडी फक्त ६२५ रुपयांत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लग्नसमारंभासाठी वापरण्यात येणारे सूट्स, शेरवानी, इंडो वेस्टर्न, जोधपुरी, सलवार कुर्ता अशा पुरूषांच्या विशेष पोषाखांच्या खरेदीसाठीही ७० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. पुरूषांचे शर्ट, टी-शर्ट, डेनिम्स आणि ट्राऊजर्ससाठी देखील ७० टक्के सवलत आहे. महिलांना कुर्तीज्‌, ट्युनिक्स, ड्रेसेस, गाऊन्स, टॉप्स, ब्रँडेड कॅज्युअल्स हे सर्व कपडे ७५ टक्के कमी भावात घेण्याची मोठी संधी आहे. एवढंच नव्हे तर किड्स रेडिमेड्सवरही तेवढीच सवलत आहे. प्रत्येक दोन हजारची खरेदी केल्यावर ८९९५ किमतीचे ब्लेझर्स अवघ्या ११०१ देण्यात येणार आहे. मार्च एण्डनिमित्त आम्ही आत्ता असलेला सर्व स्टॉक विक्रीसाठी काढत आहोत आणि नवीन वर्षात ग्राहकांसाठी नवा स्टॉक आणणार असल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. सवलतीची ही योजना काही दिवस आणि फक्त स्टॉक शिल्लक असेपर्यंतच सुरू राहील, असेही गुजर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Due to the end of March, all the stocks in the sewing world are at a lower price than the purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.