कळे येथे बांधकामावरून पडल्याने मृत्यू, २५ फूट उंचीवरून पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:03 PM2019-06-06T20:03:27+5:302019-06-06T20:07:53+5:30
नवीन घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक तोल जाऊन सुमारे २५ फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडल्याने कळे (ता. पन्हाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. सरदार जोतिराम पाटील (वय ४१, रा. कळे) असे त्यांचे नाव आहे.
कोल्हापूर : नवीन घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक तोल जाऊन सुमारे २५ फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडल्याने कळे (ता. पन्हाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. सरदार जोतिराम पाटील (वय ४१, रा. कळे) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सरदार पाटील हे शेतकरी असून, त्यांनी कळे येथे दुमजली घर बांधले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता घराच्या दुसºया मजल्यावरील नवीन बांधकामावर ते पाणी मारत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने सुमारे २५ फूट उंचीवरून ते खाली जमिनीवर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून तातडीने कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या अपघाताची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मिळेल त्या वाहनाने तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल झाले; त्यामुळे रुग्णालय आवारात मोठी गर्दी झाली होती. सीपीआर आवारात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे.