दमदार पावसामुळे कोल्हापूरचा राजाराम बंधारा पाण्याखाली -: पुलाच्या बांधकामाची क्रेन बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:48 PM2019-06-29T21:48:11+5:302019-06-29T21:52:11+5:30
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे आज, शनिवारी सायंकाळी साडेसहा सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली केला.
कसबा बावडा: गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे आज, शनिवारी सायंकाळी साडेसहा सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता ठप्प झाली आहे. दरम्यान बंधाऱ्याच्या शेजारी नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेली भलीमोठी क्रेन या ठिकाणाहून वेळेत बाहेर काढता न आल्याने ती पाण्यात बुडाली. त्यामुळे क्रेनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राजाराम बंधा?याजवळ शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास १० फूट इतकी पाण्याची उंची होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजता म्हणजे अवघ्या २४ तासात सात फुटाणे पाणी पातळी वाढली. सध्या बंधाऱ्याचजवळ सायंकाळी ६.३० वाजता सतरा फूट इतकी पाणी पातळी होती. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून बंधाऱ्यावर साचून राहिलेले केंदाळ आता खालील बाजूस मोठ्या प्रमाणात वाहून जावू लागले आहे.
दरम्यान पावसाने दमदार सुरुवात केल्याने बंधाया शेजारी नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या ठिकाणांची क्रेन हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली ही क्रेन बांधकाम ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बराच वेळ प्रयत्न केला पण त्यांना बाहेर काढता आली नाही. दरम्यानच्या काळात मात्र बंधाऱ्याजवळ जवळ पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली. बघता बघता क्रेनचा भला मोठा ट्रॅक्टर पाण्यात पूर्णपणे बुडून गेला. आता ही क्रेन पाण्याबाहेर काढणे लगेचच शक्य होणार नाही. क्रेन बाहेर काढल्यानंतरच त्याचे किती नुकसान झाले हे समजू शकणार आहे.
दरम्यान बंधारा अचानक पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून नेहमी ये-जा करणा?्या लोकांची तसेच औद्योगिक वसाहत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना लांबचा पल्ला टाकून परत फिरावे लागले.