दमदार पावसामुळे बावड्यात गवताच्या पहिल्या कापणीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:44 IST2020-06-27T16:43:24+5:302020-06-27T16:44:22+5:30
जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या कसदार हिरव्या गवताच्या पहिल्या कापणीस आता बावड्यात सूरूवात झाली आहे. गवत मंडईतही विक्रीसाठी गवताची आवकही होवू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकऱ्यांना गवताच्या एकूण चार कापण्या मिळतात.

दमदार पावसामुळे भावड्या नदीकाठच्या कसदार हिरव्या गवताच्या कापणीस आता सुरुवात झाली आहे. ( फोटो- रमेश पाटील,कसबा बावडा )
कसबा बावडा : जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या कसदार हिरव्या गवताच्या पहिल्या कापणीस आता बावड्यात सूरूवात झाली आहे. गवत मंडईतही विक्रीसाठी गवताची आवकही होवू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकऱ्यांना गवताच्या एकूण चार कापण्या मिळतात.
कसबा बावड्याच्या सभोवती नदी असल्याने नदीकाठच्या गवताच्या कुरणाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. साहाजिकच बावड्यात हिरव्या गवताचा चारा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे अनेक शेतकरी शिल्लक गवताची बावड्यात व शाहूपुरी गवत मंडईत त्याची विक्री करतात.
संपूर्ण पावसाळ्यात गवताच्या चार कापण्या मिळाव्यात म्हणून शेतकरी प्रत्येक कापणीनंतर गवताला युरिया खताचा डोस देतात. बऱ्याच वेळा पूर आला की नदीकाठचे गवत पाण्यात बुडून कुजून जाते. कुजलेले गवत वास येत असल्याने जनावरे खात नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे गवताची कापणी करताना पूरस्थितीचा अंदाज घेऊन नदीकाठच्या दिशेने गवताचे कापणीला सुरुवात केली जाते. बावड्यातील अनेक शेतकरी शासकीय कार्यालयाच्या आवारातील गवताचा लिलाव आठ-दहा जणात घेतात. सध्या शासकीय कार्यालयातील आवारातील गवताच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे.