भत्तावाढीमुळे चालक-वाहक ‘सुसाट’- दहा वर्षांत पहिल्यांदाच भरघोस वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:05 AM2018-06-15T00:05:03+5:302018-06-15T00:05:03+5:30
एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाºया भत्त्यांमध्ये परिवहन महामंडळाने भरघोस वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तावाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाºया कर्मचाºयांचा एकप्रकारे
प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाºया भत्त्यांमध्ये परिवहन महामंडळाने भरघोस वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तावाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाºया कर्मचाºयांचा एकप्रकारे सन्मान केला. या निर्णयाने महामंडळावर भत्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी ४५ कोटींवरून २५० कोटी इतका बोजा वाढणार आहे, तर राज्यातील ७० हजार चालक-वाहकांना फायदा मिळणार आहे.
राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एकमेव सेवा देणारी गाडी म्हणजे एसटी बस. प्रवाशांना सुखरूपपणे पोहोचविण्याची सेवा एसटीचे चालक-वाहक व अन्य विभागांतील कर्मचारी गेली सत्तर वर्षे अखंडपणे करीत आहेत. सण, यात्रा बाजूला ठेवून प्रवाशांच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करणाºया कर्मचाºयांना पगारासह मिळणारा भत्ता अल्प प्रमाणात असल्याने, महागाईच्या काळात त्यांची मानसिक व आर्थिक कुचंबणा होत होती. सन २००८-१२, सन २०१२-१६ मध्ये वेतन करार झाला. मात्र, त्यामध्येही फारशी भत्तावाढ झाली नाही. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीसह विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केली आहे. राज्यातील एक लाख कर्मचाºयांपैकी ७० हजार चालक-वाहकांना याचा फायदा होणार आहे.
भत्तावाढ अशी...
कामगारांना हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) १८० रुपयांवरून १ हजार २०० रुपये वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला १४ ते ५० रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट १०० रुपये इतका करण्यात आला आहे. पूर्वी असलेला ११ व १३ रुपयांचा रात्रपाळी भत्ता आता अनुक्रमे ३५ व ४५ रुपये करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता फक्त चार रुपये आहे. तो आता ७५ रुपये करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रात्रवस्ती भत्ता ११ रुपयांवरून ८० रुपये, तर विनिर्दिष्ट (मेट्रो सिटी) ठिकाणी असलेला १५ रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता १०० रुपये करण्यात आला आहे.
मंडळाच्या अध्यक्षांनी वेतनवाढीसह भत्त्यांमध्ये भरघोस वाढ केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. भत्तावाढीमुळे अतिरिक्त कामांचा परिपूर्ण मोबदला मिळणार आहे.
- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिव महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना
ही भत्तावाढ यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र ‘देर आये, दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे या भत्तावाढीचे आम्ही स्वागत करतो.
- आप्पासाहेब साळोखे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)
पूर्वीच्या भत्त्यांमध्ये चहाचे पैसे भागविणेही शक्य नव्हते. मात्र, महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या नव्या भत्तावाढीमुळे एकवेळचे जेवण तरी मिळणार आहे. त्यामुळे हिला ‘ऐतिहासिक भत्तावाढ’ म्हणता येईल.
- के. एन. पाटील, कार्याध्यक्ष, एस. टी. कामगार सेना
भत्तावाढीमुळे जादा कामासह मुक्कामाला जाणाºया चालक-वाहकांचे प्रमाण वाढणार आहे. जादा कामाच्या मोबदल्यात इतर भत्त्यांवर परिणाम होऊन पगारात महिन्याकाठी चांगली वाढ दिसून येईल. - उत्तम पाटील, विभागीय अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना