रंग नसल्याने होताहेत अपघात.......बांधकाम खाते रंगविणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 07:14 PM2018-11-26T19:14:43+5:302018-11-26T19:19:55+5:30
कोल्हापूर शहरातील उपनगरात वाढत्या वाहनांच्या संख्येने वाहतूक कोंडी टळावी , अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीस योग्य दिशा मिळावी यासाठी रस्ते रुंदीकरण करत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक विकसित करण्यात आले. दुभाजकाची दुरवस्था झाली असून दुभाजकावरील रंगाचे पट्टे गायब झाले आहेत
अमर पाटील -
कळंबा : कोल्हापूर शहरातील उपनगरात वाढत्या वाहनांच्या संख्येने वाहतूक कोंडी टळावी , अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीस योग्य दिशा मिळावी यासाठी रस्ते रुंदीकरण करत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक विकसित करण्यात आले. मात्र दुभाजकाची दुरवस्था झाली असून दुभाजकावरील रंगाचे पट्टे गायब झाले आहेत . रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या दुभाजकाना सुरक्षितेच्यादृष्टीने काळ्या पांढऱ्या अथवा काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असतात पण उपनगरातील क्रेशर चौक ते नाविन वाशीनाका, क्रेशर चौक ते संभाजीनगर, संभाजीनगर ते कळंबा तलाव, संभाजीनगर ते विद्यापीठ, गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम, रंकाळा जावळाचा गणपती ते फुलेवाडी नाका या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुभाजकांवरील पट्टे गायब झाले असून काही ठिकाणी दुभाजक तुटले आहेत तर दुभाजकांच्या मध्यभागी लावलेल्या झाडांची अवस्था दयनीय झाली आहे यावरून सुरक्षित रस्ते प्रवास व दुभाजकां बाबत पालिकेची अनास्था दिसून येत आहे
रात्रीच्या वेळी रंगामुळे दुभाजक ठळकपणे दिसतात ज्यामुळे अपघाताचा धोका टळतो उपनगरातील दुभाजकावरील रंग पूर्ण उडाले असून काही ठिकाणी चिखल व धुळीने रंग अस्तित्वहीन झालेत काही ठिकाणी दुभाजक म्हणून फुटके ब्लॉक उभे केलेत ज्यांना रंग न दिल्याने हे जीवघेणे ठरत आहेत बऱ्याच ठिकाणी दुभाजक फुटून बाहेर आलेत वाहनचालकांनी स्वतःच्या सोईसाठी दुभाजक तोडले असून वाहने कशीही धोकादायक पध्दतीने घुसडली जात आहेत या दुभाजकावर लावण्यात आलेली झाडे छाटली नसल्याने कशीही वाढत आहेत
रंगहीन दुभाजक अंधारात न दिसल्याने कळंबा साई मंदिर चौकात दुभाजकाना दुचाकी धडकून तीन जण मृत्यू पावले तपोवन मैदानानजीक एसटी दुभाजकास धडकून विजेचा खांब रस्त्यावर कोसळला होता रंगहीन दुभाजकांमुळे अंधारात होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे
रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी उपनगरात रस्त्यांवर दुभाजक उभारले असून वाहनांना दिशा देण्याबरोबर अपघात रोखण्यासाठी हे गरजेचे आहेत दुभाजकामुळे पादचाऱ्यांना कुठूनही रस्ता ओलांडता येत नाही शिवाय वाहने विरुद्ध दिशेस जाऊ शकत नसल्याने अपघात होत नाहीत उपनगरातील दुरवस्था झालेल्या या दुभाजकाची दुरुस्ती वेळेत व्हावी ही मागणी जोर धरत आहे
फलक रेफलेक्टर गायब
वाहनांना दुभाजक निदर्शनास यावेत यासाठी उपनगरातील दुभाजकांपुढे रेफलेक्टर सह काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असणारे फलक लावण्यात आले होते यातील बरेच गायब काही वाहनांच्या धडकेने वाकलेले काही दिसत नसल्याने असून नसल्यासारखे मग सुरक्षित रस्ते प्रवास होणार कसा
कोल्हापूर शहरातील उपनगरात पालिका बांधकाम खात्याचे अनेक रस्ते तसचे , दुभाजक, खड्डे यांकडे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासंबंधी तक्रार देऊनही याची दखल गांभिर्याने बांधकाम विभाग घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करती जीवितहाणी झाल्यावरच बांधकाम विभाग लक्ष देणार का असा सवाल करीत आहे. शहरातील ही उपनगर महत्वाची असून सुशिक्षित वस्ती तसेच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. आधीच रस्ते अरूंद असल्याने पालिका डथळा होत असतानाच दुभाजकांची ही अवस्था असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याने याकडे बांधकामने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.