सदाभाऊंची उणीव मादनाईक, तूपकर भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:50 AM2017-10-23T00:50:04+5:302017-10-23T00:50:04+5:30

Due to lack of gravity, gourmet gourds will fill | सदाभाऊंची उणीव मादनाईक, तूपकर भरणार

सदाभाऊंची उणीव मादनाईक, तूपकर भरणार

Next



संतोष बामणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुधवार, २५ रोजी पंढरपूर, तर शनिवार, २८ रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहेत. तर आजपर्यंतच्या १५ ऊस परिषदा खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून यशस्वी केल्या आहेत. तर सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर ही ऊस परिषदा पहिल्यांदाच होत आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने पुन्हा जोमाने १६व्या ऊस परिषदेची तयारी केली जात आहे.
ही ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे मादनाईक व तूपकर यांनी सदाभाऊंची उणीव भरून काढण्याचे काम सुरू केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना २००२मध्ये उदगाव गावात करण्यात आली. त्यानंतर दूध व औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचे आंदोलन केल्यानंतर उदगावसह परिसरातील शेतकºयांनी व सावकार मादनाईक यांच्या पाठबळावर राजू शेट्टी यांनी उदगाव जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. त्यानंतर एकवेळा आमदार तर आता दुसºयांदा ते खासदार झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आतापर्यंत उसाच्या दराचा मुद्दा घेऊन शेतकºयांना आपापल्या मालाला भाव देण्याचे काम केले आहे.
तर खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबरीने लढणारे सदाभाऊ खोत या दोघांच्या राम-लक्ष्मणच्या जोडीने आजपर्यंत स्वाभिमानाने मोठे यश मिळविले आहे. तर गेल्या सहा महिन्यांपासून मंत्री खोत व स्वाभिमानीमध्ये मतभेद निर्माण झाल्याने स्वाभिमानीतून खोत यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या ऊस परिषदेत मंत्री खोत यांचे रांगडे भाषण ऐकायला शेतकरी आतूर असायचा. तर मंत्री खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केल्याने स्वाभिमानी संघटनेत मोठी उणीव निर्माण झाली आहे. मात्र, ती उणीव भरून काढण्यासाठी स्वाभिमानीचे शिलेदार सावकार मादनाईक व रविकांत तूपकर यांनी मराठवाडा, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र तर कर्नाटकातील सीमाभागात सभा घेवून शेतकºयांना ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच स्वाभिमानीचे सर्वच कार्यकर्ते ऊस परिषदेच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही १६वी ऊस परिषद ही स्वाभिमानीच्या अस्तित्वाची असणार असल्याचे दिसून येत आहे.

तूपकर असणार मुलुख मैदानी तोफ
स्वाभिमानीचे विदर्भातील युवा कार्यकर्ते रविकांत तूपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्यावर शेतकºयांचा विश्वास वाढला आहे. तूपकर यांनी महाराष्ट्रभरात दौरे करून शेतकºयांना जागृत करण्याचे काम करीत आहेत. तर सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी केल्यामुळे स्वाभिमानीला कोणताच फरक पडणार नसल्याचे तूपकर म्हणतात. तर रांगड्या मराठी भाषेचे कौशल्यही तूपकर यांच्याकडे असल्याने शेतकरी आता मुलुख मैदानी तोफ म्हणून तूपकर यांची ओळख होणार आहे.

Web Title: Due to lack of gravity, gourmet gourds will fill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.