कृष्णाकाठ माती उत्खननामुळे धोक्यात

By admin | Published: May 3, 2017 12:26 AM2017-05-03T00:26:27+5:302017-05-03T00:26:27+5:30

प्रशासनाकडून कारवाई नावापुरतीच : रात्रीचा दिवस करून मळीच्या मातीची लूट सुरूच

Due to the pitfalls of soil in Krishna's pitcher | कृष्णाकाठ माती उत्खननामुळे धोक्यात

कृष्णाकाठ माती उत्खननामुळे धोक्यात

Next

संतोष बामणे --- उदगाव ---कृष्णाकाठावरील मळीची माती सुपीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीटभट्टी कामासाठी वापरली जात आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील असलेल्या गावांना पुराचा धोका व मळीघाट नामशेष होत आहे. हीच परिस्थिती उदगाव, चिंचवाड भागात आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे नियमबाह्य मातीचे उत्खनन सुरू आहे़
नदीकाठी मातीचे उत्खनन रात्रंदिवस सुरू असल्यामुळे नदीचे संवर्धन टिकविण्यासाठी उपाययोजना न करता राजरोसपणे उदगाव, चिंचवाड, कोथळी परिसरात नियमबाह्य माती उत्खनन सुरू आहे़ परवान्यापेक्षा अधिक बेकायदेशीरपणे उत्खनन केले जात आहे़
कृष्णा नदीकाठावरील लाल माती उपसा करून सांगली जिल्ह्यातील अंकली, हरिपूर, इनामधामणी, बामणी, टाकळी, मिरज, बोलवाड या ठिकाणी साठवणूकही केली जाते, तर उदगाव-चिंचवाड परिसरात अनेक जणांनी माती उत्खनन करून साठाही
केला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवून होत असलेल्या नियमबाह्य माती उपशाला महसूल विभागाने वेळीच आवर घालणे गरजेचे होते. सध्याच्या स्थितीत अगदी नदीपात्रालगत माती उत्खनन केल्याने नदीच्या काठावरील संवर्धन धोक्यात आले आहे.
एकीकडे राज्य शासन पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धनासाठी विविध योजना राबवीत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या माती उत्खननामुळे कृष्णाकाठ काळाआड जाण्याची शक्यता आहे़
चिंचवाड-उदगाव परिसरात माती उत्खनामुळे मळीच्या शेतीचा व्यास होत चालला आहे़ त्यामुळे नदीचे पात्र मोठे झाले असून, अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी थेट गावात येणार आहे. आजच्या स्थितीला शेतकऱ्यांना कृष्णाकाठ शोधावा लागणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने एक पाऊल पुढे येऊन माती उत्खननाची नियमावली देणे गरजेचे आहे.



काय आहे जबाबदारी
माती उत्खनन करीत असताना नदीपात्राच्या परिसरातील वनस्पती व प्राणी यांना धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. उत्खननाला ठेका दिलेल्या एकूण क्षेत्राच्या समप्रमाणात इतक्या क्षेत्रावर नदीकाठी अथवा अन्य ठिकाणी वृक्षलागवड करून त्यांची माहिती ग्रामपंचायतीला देण्याची आहे. तसेच वृक्षलागवड करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचा आहे. सार्वजनिक पाणवठा, पाणीपुरवठा व्यवस्था असलेल्या ठिकाणापासून १०० मीटर अथवा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा करताना निश्चित करेल तेवढ्या अंतरापलीकडे उत्खनन करायचे आहे.


प्रशासनाचे दुर्लक्ष
शासनाचा महसूल भरतो, मग माती उपसणारच, अशी भूमिका घेत हजारो ब्रास मातीचे उत्खनन उदगाव, चिंचवाड परिसरात सुरू आहे़
यातूनच वीटभट्टीमालकांना मोठा फायदा होताना दिसत आहे़ दरम्यान, प्रशासनाने पाहणी करून मातीचे उत्खनन किती केले आहे यावर जुजबी कारवाई केल्याचे दिसून येते.

Web Title: Due to the pitfalls of soil in Krishna's pitcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.