कोल्हापुरात रक्ताची टंचाई संकलन ठप्प : शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची हॉस्पिटलवर वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:15 AM2018-05-12T01:15:50+5:302018-05-12T01:15:50+5:30

कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी, लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्प

Due to the scarcity collection in Kolhapur, jam: the time to defer the surgery | कोल्हापुरात रक्ताची टंचाई संकलन ठप्प : शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची हॉस्पिटलवर वेळ

कोल्हापुरात रक्ताची टंचाई संकलन ठप्प : शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची हॉस्पिटलवर वेळ

Next

राजाराम लोंढे।
कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी,
लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्प
झाली आहेत. शिबिरे होत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे. परिणामी, बड्या हॉस्पिटलना शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे.

रक्तदान चळवळ कोल्हापुरात खऱ्या अर्थाने रूजली आहे. सामाजिक काम म्हणून रक्तदान करणाºया व्यक्तींची संख्याही काही कमी नाही. आपल्याकडे सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. फेबु्रवारी, मार्च महिन्यात परीक्षा असल्याने शिबिरांचे प्रमाण कमी होते. एप्रिल ते जूनमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, लग्नसराई, पर्यटनासाठी लोक घराबाहेर पडले आहेत, ग्रामीण भागात शेतीच्या कामांची धांदल उडालेली असते, त्यात कडक उन्हामुळे एकदमच रक्तदान शिबिरे ठप्प होतात. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा ठणठणाट पहावयास मिळत आहे.

कोल्हापुरात सरासरी महिन्याला ७ ते ८ हजार पिशव्यांचे संकलन होते आणि ८ ते ९ हजार पिशव्यांची मागणी असते. सध्या रक्त संकलन पूर्णपणे बंद आणि मागणी तेवढीच आहे. त्यात रक्त साठवणुकीसाठी विशिष्ट कालमर्यादा असल्याने रक्तटंचाई भासत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये केवळ तातडीच्या शस्त्रक्रियाच होत आहेत. ज्या शस्त्रक्रिया दोन-तीन महिन्यांनी करणे शक्य आहे, अशा लांबणीवर टाकल्या जात आहेत. रक्तटंचाई दूर करण्यासाठी रक्तपेढ्यांनी सामुदायिकपणे प्रयत्न करणे गरजेचे असून एप्रिल, मे महिन्यासाठी शिबिरांचे आयोजन केले पाहिजे.

रक्त घटकांचे आयुष्यमान असे-
रक्तघटक आयुष्यमान
प्लेटलेटस ५ दिवस
संपूर्ण रक्त ३२ दिवस
तांबड्या पेशी ४२ दिवस
प्लाझमा १ वर्ष
क्रायो १ वर्ष

ऐच्छिक रक्तदानामुळे पेच
रुग्णाला तातडीने रक्त हवे असते आणि रक्तपेढीत रक्तनसते, अशा वेळी बदली रक्तदेऊन आवश्यक घटक घेतला जातो. पण राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आदेशानुसार रक्तदान हे ऐच्छिक असल्याने रक्तपेढ्यांसमोर पेच आहे.

तांबड्या पेशींची अधिक गरज
सुट्टी असल्याने सध्या नियोजित शस्त्रक्रियांची संख्याही अधिक असते. त्यामुळे रक्ताची मागणीही वाढते, सध्याचे वातावरण पाहता इतर रक्त घटकांच्या तुलनेत तांबड्या पेशींची मागणी अधिक असते.

-टंचाईवर काय करावे
जयंती, उत्सवादिवशी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करणे टाळणे.
टंचाईच्या काळात म्हणजे एप्रिल, मे महिन्यासाठी शिबिरांसाठी हॉस्पिटलने पुढाकार घ्यावा.
नियोजित शस्त्रक्रिया करणाºया रुग्णांच्या नातेवाईकांनी अगोदरच रक्तदान करून रक्ताची गरज पूर्ण करावी.

तीव्र उन्हाळा, महाविद्यालयांना सुट्टीसह इतर कारणांमुळे रक्तटंचाई भासते. यासाठी एकदम रक्तसंकलन न करता, टप्याटप्प्याने करावे. अनावश्यक साठाही अनेकवेळा खराब होतो.
- प्रकाश घुंगूरकर, अध्यक्ष, जीवनधारा ब्लड बॅँक


 

Web Title: Due to the scarcity collection in Kolhapur, jam: the time to defer the surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.